Homeराज्यहजरत पैगंबर बद्दल अपशब्द वापरणाऱ्या नुपुर शर्माला अटक करा...

हजरत पैगंबर बद्दल अपशब्द वापरणाऱ्या नुपुर शर्माला अटक करा…

हजरत पैगंबर बद्दल अपशब्द वापरणाऱ्या नुपुर शर्माला अटक करा म्हणून संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने मिरज प्रांतला धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले: नुपूर शर्मावर ताबडतोब गुन्हा दाखल करून अटक करा…

सांगली – ज्योती मोरे

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मावर केंद्रसरकार व राज्य सरकारने गुन्हा दाखल करून अटक करून तुरुंगात पाठवावे व त्याच्यावर UAPA,NSA,सारख्या गुन्हे दाखल करावे नुपुर शर्मा याने हजरत पैगंबर याबद्दल जे विधान केलेले आहे त्या विधानाबद्दल त्यांच्यावर कठोर ते कठोर शिक्षा व्हावी… जेणेकरून भविष्यात कोणीही पैगंबरां बद्दल व इतर जातीय धर्मीय पंथाच्या महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणार नाही.

यासाठी सर्व मुस्लीम बांधवांची प्रथम मागणी अशी की त्याला फाशी द्यावी.जे टीव्ही वाले धार्मिक वाद विवाद निर्माण करतात देशांतर्गत अशांतता माजवत आहे रासुका लावावे.तसेच त्यांच्यावर आय पी सी कलम 153A, 153B, 295B, 298 आणि 505 नुसार नुपूर शर्मावर गुन्हे दाखल व्हावे याकरिता मिरजेत सविधान बाचाव संघर्ष समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले व म मिरज प्रांतसो यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्रीना निवेदन देण्यात आले मिरजेत मुस्लिम बांधव शांततेत,

व सनदशीर लोकशाही मार्गाने आंदोलन केले संविधान जिंदाबाद… संविधान जिंदाबाद… नुपुर शर्मा मुर्दाबाद… नुपुर शर्मा मुर्दाबाद… नुपुर शर्माला अटक करा …नुपुर शर्माला अटक करा…अशा प्रकारचे निषेधाचा घोषणा देऊन मिरज किसान चौक परिसर दणाणून सोडले व तीव्र शब्दात निषेध केला. यावेळीशकील पिरजादे ,जैलाब शेख, माजित मुत्वली,महबूबअली मनेर,अर्कान बेग, इस्माईल भाई निपाणीकर,युनूस चाबुकस्वार जहीर मुजावर,प्रमोद इनामदार,जावेद मनेर,मसूद भाडी,मौलाना इर्शाद,आदींसह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा मिरज किसान चौकात व मिरज प्रांत कार्यालय येथे बंदोबस्तासाठी होता.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments