HomeAutoऑडी इंडियाने नवीन 'ऑडी क्यू३' लॉन्च...फक्त ७.३ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास...

ऑडी इंडियाने नवीन ‘ऑडी क्यू३’ लॉन्च…फक्त ७.३ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करते…

न्युज डेस्क – ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज नवीन ऑडी क्यू३ प्रिमिअम प्लस व टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये लॉन्च केली. नवीन ऑडी क्यू३ सर्वोत्तम वैशिष्ट्यांनी युक्त परिपूर्ण कौटुंबिक कार आहे. आता सेकंड जनरेशनमधील ऑडी क्यू३ व्हिज्युअली अधिक डायनॅमिक असण्यासोबत एैसपैस जागा, वैविध्यता व तंत्रज्ञानाच्या संदर्भात आपल्या वारसाला अधिक पुढे नेले आहे. नवीन ऑडी क्यू३ मध्ये प्रमाणित म्हणून क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह आहे आणि २.० लिटर टीएफएसआय इंजिन आहे, जे १९० एचपी शक्ती व ३२० एनएम टॉर्कची निर्मिती करते. ही कार फक्त ७.३ सेकंदांमध्ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्त करते. नवीन ऑडी क्यू३ साठी डिलिव्हरींना या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरूवात होईल.

नवीन ऑडी क्यू३ पल्स ऑरेंज, ग्लेशियर व्हाइट, क्रोनोस ग्रे, मिथोस ब्लॅक आणि नवारा ब्ल्यू या पाच आकर्षक बाह्य रंगांमध्ये उपलब्ध आहे. कारच्या उपलब्ध इंटीरिअर रंग पर्यायामध्ये ओकापी ब्राऊन व पर्ल बिज यांचा समावेश आहे. ऑडी क्यू३ प्रिमिअम प्लस आणि टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे. प्रिमिअम प्लस व्हेरिएण्टची किंमत ४४,८९,००० रूपये आणि टेक्नोलॉजी व्हेरिएण्टची किंमत ५०,३९,००० रूपये आहे.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “आज आम्ही नवीन ऑडी क्यू३ च्या लॉन्चसह आमची उत्पादन श्रेणी वाढवत आहोत. ऑडी क्यू३ भारतातील सर्वाधिक विक्री होणारी व विभागातील अग्रणी कार राहिली आहे. आम्हाला विश्वास आहे की, नवीन ऑडी क्यू३ तिच्या यशाची पुनरावृत्ती करेल. नवीन ऑडी क्यू३ सह आम्ही या वेईकलचा नवीन लुक व दर्जात्मक वैशिष्ट्यांसह सर्वोत्तम तत्त्व सादर करत आहोत.”

नवीन ऑडी क्यू३ तिच्या पूर्वीच्या मॉडेलपेक्षा अधिक स्‍पोर्टियर दिसते आणि सर्व आकारमानांमध्ये वाढ करण्यात आली आहे. अष्टकोनी डिझाइनमधील लक्षवेधक सिंगल फ्रेम उभ्या बार्समध्ये विभागण्यात आली आहे, तर मोठ्या एअर इनलेट्समधून पुढील बाजूची प्रबळ क्षमता आणि प्रकाश व सावलीची व्यापक आंतरक्रिया दिसून येते. अरूंद हेडलाइट्स त्यांच्या वेज आकारासह आतील बाजूने असल्यासारखे दिसतात.

नवीन ऑडी क्यू३ मध्ये क्वॉट्रो ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टिम आहे, जी सर्व प्रकारच्या रस्त्यांवर घर्षण, गतीशीलता, स्थिरता व डायनॅमिक हाताळणीसंदर्भात सर्वोत्तम सुविधा देते. तसेच नवीन ऑडी क्यू३ ची ड्रायव्हिंग क्षमता वाढवण्यासाठी व समायोजित करण्यासाठी ऑडी ड्राइव्ह सिलेक्‍ट ड्रायव्हरला ड्रायव्हिंग मोड्समधून निवड करण्याची सुविधा देते.

विनासायास मालकीहक्क अनुभवासाठी नवीन ऑडी क्यू३ अनेक मालकीहक्क लाभांसह उपलब्ध आहे, जसे पहिल्या ५०० ग्राहकांसाठी ५ वर्षांची एक्स्टेण्डेड वॉरंटी आणि ३ वर्ष / ५०,००० किमी कॉम्प्रेहेन्सिव्ह सर्विस व्हॅल्यू पॅकेज. विद्यमान ऑडी इंडिया ग्राहकांना देखील लॉयल्टी लाभ मिळतील.

नवीन ऑडी क्यू३ प्रिमिअम प्लसची वैशिष्ट्ये:

› ४५.७२ सेमी (आर१८) ५-आर्म स्टाइल अलॉई व्हील्स

› क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह

› एलईडी हेडलॅम्प्ससह एलईडी रिअर कॉम्बीनेशन लॅम्प्स

› पॅनोरॅमिक ग्लास सनरूफ

› उच्च ग्लॉस स्टायलिंग पॅकेज

› पॉवर अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससह फोर-वे लम्बर सपोर्ट

› लेदर/लेदरेट कॉम्बीनेशनमध्ये सीट अपहोल्स्टरी

› रिअर सीट प्लससह फोअर/अॅफ्ट अॅडजस्टमेंट

› लेदरमध्ये रॅप केलेले ३-स्पोक मल्टीफंक्शन प्लस स्टिअरिंग व्हीलसह पॅडल शिफ्टर्स

› सिल्व्हर अॅल्युमिनिअम डायमेन्शनमध्ये डेकोरेटिव्ह इन्सर्ट्स

› अॅम्बियण्ट लायटिंग पॅकेज (सिंगल कलर)

› पुढील बाजूस स्कफ प्लेट्ससह अॅल्युमिनिअम इन्सर्ट्स

› स्टोरेज व लगेज कम्पार्टमेंट पॅकेज

› कम्फर्ट सस्पेंशन

› हिल स्टार्ट असिस्ट

› फ्रेमलेस ऑटो-डिमिंग इंटीरिअर रिअर व्ह्यू मिरर

› २-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टिम

› पार्किंग एड प्लससह रिअर व्ह्यू कॅमेरा

› क्रूझ कंट्रोल सिस्टिमसह स्पीड लिमिटर

› एक्स्टीरिअर मिरर्स, पॉवर अॅडजस्टेबल, हिटेड व पॉवर फोल्डिंग, दोन्‍ही बाजूस ऑटो-डिमिंग

› डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर

› ब्ल्यूटूथ इंटरफेस

› ऑडी स्मार्टफोन इंटरफेस

› इलेक्ट्रोमेकॅनिकल पॉवर स्टिअरिंग

› सहा एअरबॅग्ज

› टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम

› इसोफिक्स चाइल्ड सीट अँकर्स आणि बाहेरील रिअर सीट्ससाठी टॉप टेथर

› ऑडी-थेफ्ट व्हील बोल्ट्स

› स्पेस-सेव्हिंग स्पेअर व्हील

उपरोक्त वैशिष्ट्यांव्यतिरिक्त ऑडी कयू३ च्या टेक्नोलॉजी व्हेरिएण्ट पॅक्समध्ये पुढील वैशिष्ट्ये आहेत.

नवीन ऑडी क्यू३ टेक्नोलॉजीची वैशिष्ट्ये:

› अॅल्युमिनिअल लुकमधील इंटीरिअर (मिरर अॅडजस्टमेंट स्विचवरील एलीमेण्ट्स, पॉवर विंडो स्विचेस, पार्किंग ब्रेक कंट्रोल बटन आणि अॅल्युमिनिअम लुकमधील डोअर स्ट्रिप्स)

› एमएमआय नेव्हिगेशन प्लससह एमएमआय टच

› ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट

› ऑडी व्हर्च्युअल कॉकपीट प्लस

› अॅम्बियण्ट लायटिंग पॅकेज प्लस (३० रंग)

› कम्फर्ट कीसह गेस्चर-नियंत्रित टेलगेट

› लगेज कम्पार्टमेंट लिड, जे इलेक्ट्रिकली उघडते व बंद होते

› ऑडी फोन बॉक्ससह वायरलेस चार्जिंग सिस्टिम

› ऑडी साऊंड सिस्टिम (१० स्पीकर्स, १८० वॅट)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments