Homeराज्यदेशात कायदा व सुव्यवस्था स्थापन करण्यासाठीच बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला!...प्रा. किरण...

देशात कायदा व सुव्यवस्था स्थापन करण्यासाठीच बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला!…प्रा. किरण भोसले

पळसंबे येथील लेणी अभ्यासदौरा व दीपोत्सव उत्साहात साजरा…

कोल्हापूर – राहुल मेस्त्री

देशात कायदा व सुव्यवस्था निर्माण व्हावा म्हणूनच आधुनिक बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म आपल्याला दिला असून त्याचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे. जगाचा इतिहास सांगतो की धार्मिक प्रचारासाठी बौद्ध धम्म अनुयायांनी कधीही कोणावर कसल्याही प्रकारचे आक्रमण केलेले नाही. यामुळेच बौद्ध धम्म जगभर पसरला आहे, तीच परंपरा आपण सर्वांनी अंगिकारुन पुढे चालत राहू व या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याचे उदाहरण समाजापुढे ठेवू असे प्रतिपादन युवा बौद्ध धम्म परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.किरण भोसले यांनी केले.ते पळसंबे ता.गगनवावडा येथील बौद्ध लेणी अभ्यास दौऱ्यात बोलत होते.

दि.11 रोजी युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य तसेच मूर्ती आणि शिल्प संशोधन संस्था औरंगाबाद, शाखा-कोल्हापूर आयोजित कोल्हापूर जिल्ह्यातील पळसंबे ता. गगनबावडा येथील बौद्धकालीन लेणी अभ्यास दौरा व दीपोत्सव अत्यंत उत्साहाने पार पडला.यावेळी पळसंबे येथील विश्वशांती बौद्ध विहार येथे गगनवावडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या हस्ते महामान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण केला.सचिन कांबळे यांनी स्वागत केले तर प्रास्ताविक करताना सतिश भारतवासी यांनी या अभ्यास दौऱ्याचा उद्देश व दौऱ्यासंबंधीची रुपरेषा सर्वांना समजून सांगितली.उपस्थित जेष्ठांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.त्याचबरोबर त्रिशरण पंचशील व बुद्ध वंदना घेण्यात आली.

यावेळी कोल्हापूर जिल्हा समन्वयक डॉ. संतोष भोसले यांनी संस्थेची कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. आणि “राज्यातील सर्व लेण्या अभ्यास, लेखन, संशोधन आणि योग्य कृतीकार्यक्रमांच्या आधारे उजागर करण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत” असे प्रतिपादन केले. आयोजकांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद देत पळसंबे येथील जय भीम ग्रंथालयाला आयोजकासह अनेक बौद्ध बांधवांनी ग्रंथ प्रदान केले.कोल्हापूर येथील सत्यसुधारक हॉटेलचे मालक गंगाराम कांबळे यांचे नातू तात्यासाहेब कांबळे यांनीही लेणी अभ्यास दौऱ्यास भेट देऊन ग्रंथदान केले.याप्रसंगी २ राज्ये, ४ जिल्हे आणि १२ तालुक्यातून सुमारे २०० हून अधिक धम्म बांधव उपस्थित होते. आयोजन समिती तर्फे सर्वांचे कौतुक, अभिनंदन व.आभार प्रदर्शन करण्यात येत आहे.सुत्रसंचालन सतिश भारतवासी यांनी केले….

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments