Homeगुन्हेगारीबडनेरा | ३२ वर्षीय युवकाची भर रस्त्यावर धारदार शस्त्राने केली हत्या...

बडनेरा | ३२ वर्षीय युवकाची भर रस्त्यावर धारदार शस्त्राने केली हत्या…

बडनेरा येथील बसस्थानकासमोर वर्दळीच्या ठिकाणी भर रस्त्यावर एका 32 वर्षे युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना २६ जुलैच्या एक ते दीड वाजताच्या दरम्यान घडली असून मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले तर बडनेरा पोलीस मारेकरांचा शोध घेत आहे.

याबाबत सविस्तर असे की बडनेरा येथील मिल चाळीत राहणारा अंकुश सागर मेश्राम वय वर्षे 32 याला काही युवकांनी भाईगिरीच्या वर्चस्वावरून मोठे वाद झाले असून या वादावरून काही युवकांनी अंकुश यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घुण हत्या केली बडनेरा बस स्थानकासमोर भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

घटनास्थळी पोलीस दाखल होताच घटनेचा पंचनामा करून मृतदेह अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आरोपीची नावे अद्याप प्राप्त झाली नसून पुढील तपास बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक बाबाराव अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments