Friday, March 29, 2024
Homeराज्यकंधार तालुक्यातील शिराढोणचे भूमिपुत्र जवान राजेश्वर भुरे कर्तव्य बजावताना शहीद; उद्या शासकीय...

कंधार तालुक्यातील शिराढोणचे भूमिपुत्र जवान राजेश्वर भुरे कर्तव्य बजावताना शहीद; उद्या शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

कंधार तालुक्यातील शिराढोण येथील राजेश्वर आनंदराव भुरे या लष्करी जवानाला कर्तव्य बजावत असताना सिंकद्राबाद येथे वीरमरण आले असून त्यांच्या पार्थिवावर दिनांक 6 सप्टेंबर रोजी शिराढोण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

हैद्राबाद मधील सिकंद्राबाद या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना 4 सप्टेंबर रोजी वीर जवान राजेश्वर भुरे यांना वीर मरण आले आहे. शिराढोण येथील रहिवासी राजेश्वर आनंदराव भुरे हे गेल्या 13-14 वर्षा पासून इएमई बटालियनमध्ये आपले कर्तव्य चोखपणे बजावत होते. शहीद जवान राजेश्वर भुरे यांच्या पश्चात आई, वडिल,पत्नी, एक मुलगा 2 मोठे भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर 6 सप्टेंबर रोजी शिराढोण येथे सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: