Homeराज्यरस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिलांना मारणारा " तो " दुचाकीस्वार कोण ?...दोन महीण्यात...

रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिलांना मारणारा ” तो ” दुचाकीस्वार कोण ?…दोन महीण्यात चार ते पाच घटना…

शहरातील महिलांमध्ये भितीचे वातावरण…रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या महिलांना करतो मारहाण…

रामटेक – राजु कापसे

एक अज्ञात इसम दुचाकीवरून येऊन रस्त्याने चालणाऱ्या महिलांना मारहान करून पळुन जात असल्याच्या घटना सध्या शहरात घडत आहे. गेल्या दोन महीण्यात याप्रकारच्या तिन ते चार घटना घडलेल्या असुन यामुळे शहरातील विशेषतः महिला वर्गात भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

शहरातील शिवाजी वार्डातील बर्वे शाळेमागील दोन महिलांवर असा प्रसंग ओढवला असुन त्या या घटनेमुळे चांगल्याच धास्तीमध्ये आलेल्या आहे. या दोन महिलांपैकी एका तरुण महिलेवर एका महिन्यापुर्वी हा प्रसंग ओढवला तर दुसऱ्या वयोवृद्ध महिलेवर गेल्या चार – पाच दिवसांपूर्वी हा प्रसंग ओढवला आहे.

यापैकी तरुण महिलेने दिलेल्या माहीतीनुसार गेल्या एक महीन्यापुर्वी ती सायंकाळच्या सुमारास शहरातील रामजी महाजन देशमुख नगर परीषद शाळेजवळुन येत असतांना मागुन एक सडपातळ अंगकाठी असलेला अज्ञात दुचाकीस्वार आला. त्याने सदर तरुण महिलेला हाताने मारहान केली व लगेच तेथुन पसार झाला. त्या इसमाची रंग काठी कशी होती असे सदर महिलेला विचारले असता पाठीमागुन त्याला निट पहाता आले नाही असे तिने सांगीतले.

त्याचप्रमाणे याच वार्डातील वयोवृद्ध महिलेसोबतही असाच प्रकार नुकत्याच चार – पाच दिवसांपुर्वी घडला. या प्रकारामुळे सदर दोन्ही महिला धास्तावुन गेलेल्या आहेत. शहरातील एका वयोवृद्ध महिलेने सांगीतलेल्या माहीतीवरून गेल्या दोन महिन्यात अशाप्रकारच्या चार ते पाच घटना शहरात घडलेल्या असुन तो अज्ञात इसम विशेषतः महिलांनाच मारहान करीत आहे.

सदर प्रकार शहरातील काही नागरीकांना माहिती पडताच त्यांनी रस्त्यावरील काही ठिकाणचे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे तपासले असता त्या अज्ञात इसमाच्या दुचाकीचा क्रमांक स्पष्ट दिसुन येत नाही. सदर अज्ञात इसम वेडसर असता तर त्याने दुचाकी चालविली असती काय ? तो दुचाकीवरून कशाला आला असता अशा प्रकारचे स्थानिक काही नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments