Homeराज्य१२ जून २०२२ रोजी भाजपा कार्यकर्ता मेळावा...

१२ जून २०२२ रोजी भाजपा कार्यकर्ता मेळावा…

सांगली – ज्योती मोरे

केंद्र शासनास आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी सांगले शहर जिल्हा तर्फे भावे नाट्य मंदिर येथे दिनांक 12 जून रोजी दुपारी 3 वाजता कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यासाठी आज आमदार सुधीर दादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालय येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या नियोजन साठी सांगली शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांची व्यापक बैठक जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे व शेखर इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

यावेळी बोलताना प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखरजी इनामदार म्हणाले मोदींच्या नेतृत्वा खाली केंद्रातील भाजपा सरकारला आठ वर्ष पूर्ण झाली असून या काळामध्ये मोदी सरकारनी असंख्य जनकल्याण्याच्या योजनाचा सुरू केल्या. या योजनेचा लाभ भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा.या मेळाव्याला सांगली जिल्ह्यातील सर्व भागातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्तेनी सामील व्हावे असे आवाहन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हणाले, देशातील सर्वसामान्य जनतेचा मोदींच्या नेतृत्वावर ठाम विश्वास आहे. त्या मुळेच देशातील जनतेने नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यातील विधानसभांच्या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळवून दिले आहे. रविवारी होणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्या मध्ये आपण प्रचंड संख्यने सामील व्हावे.

असे आवाहन केले. यावेळी बोलताना अनुसूचित मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखडे म्हणाले मोदीनी आठ वर्षाच्या कार्यकाळात अनुसूचित जाती जमाती साठी, गोरगरीब वंचित समाजा साठी अनेक योजना जाहीर केल्या व राबवण्यात आल्या आहेत. या बैठकीत स्वागत व प्रास्तावना सरचिटणीस अविनाश मोहिते यांनी केले व आभार मोहन वाटवे यांनी मानले.

या बैठकीला महिला नेत्या सौ नीताताई केळकर, ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सौ संगीता ताई खोत, गटनेते विनायक सिंहासने, संघटन सरचिटणीस दीपक माने, सरचिटणीस केदार खाडिलकर, स्थायी समितीचे सभापती,निरंजन आवटी, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष धीरज सुरवंशी, नगरसेवक, पांडुरंग कोरे, लक्ष्मण नवलाई, युवराज बावडेकर, सुब्राव तात्या मद्रासी, प्रकाश दंग, रणजीतसिंह सावर्डेकर,

महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सौ स्वातीताई शिंदे, सौ भारतीताई दिगडे,सौ सविता मदने, सौ कल्पना कोळेकर,सौ गीतांजली ढोपे पाटील, सौ कल्लोळ, सौ अप्सरा वायदंडे, उर्मिला बेलवलकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमर पडळकर, कोषाध्यक्ष डॉ. भालचंद्र साठे, बाळासाहेब पाटील, विश्वजीत पाटील, कयूम शेख, प्रियानंद कांबळे, राजेंद्र नातू,रवींद्र सदामते, उदय मुळे, शुभम कुलकर्णी,रवींद्र वादवणे, सौ ज्योती कांबळे, सौ माधुरी वसगडेकर, प्रथमेश वैद्य, अनिकेत खिल्लारे, सुजित काटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments