आता नागरीकांना होणार येथेच रक्तसाठा उपलब्ध…
रामटेक – राजु कापसे
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या शुभ पर्वावर आज दि. १२ जुन ला शहराच्या बायपास रस्त्यावरील रियान रुग्णालय येथे रामवंदना बहुद्देशीय संस्था रामटेक, स्वराज्य संगठन रामटेक, शिवगर्जना युवा प्रतिष्ठान मनसर, रियान रुग्णालय रामटेक, प्रभास बहुउद्देशीय ट्रस्ट रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता दरम्यान सुरु झालेल्या या रक्तदान शिबीरात तब्बल ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
विशेष म्हणजे रियान रुग्णालयाचे सर्वेसर्वा डॉ. प्रदीप बोरकर यांनी सुद्धा रक्तदान करून इतरांपुढे आदर्श ठेवत प्रोत्साहित केले. यावेळी लाईफ लाईन रक्तपेढीतील संपुर्ण चमु रक्तसंकलनासाठी येथे सज्ज होती. शिबीराच्या यशस्वीतेसाठी मोनू रघुवंशी, राम देशमुख, अभिषेक डाहारे, राहुल काटोले, हर्षल देशमुख, आदर्श बघेले आदींनी मोलाचे सहकार्य केले.