कोल्हापूर – राजेद्र ढाले
कोल्हापूर दक्षिण चे लाडके आमदार मा.श्री.ऋतूराज संजय पाटील (दादा) यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तामगांवातील शामराव जीनाप्पा कांबळे हे दि.06-06-2022 रोजी मयत झाले. त्यांच्या नातेवाईकांनी रक्षा विसर्जनाच्या दिवशी अनिष्ट प्रथा/रूढी, विधवा चाली रितीच्या विरोधात ग्रामपंचायत तामगांव यांच्या वतीने सरपंच उपसरपंच, पोलीस पाटील, तंटा मुक्त समितीचे अधक्ष, ग्रामसेविका, ग्रामपंचायत सदस्या यांनी अनिष्ट प्रथा/रूढी विधवा प्रता निर्मूलनाची माहिती देऊन जन जागृती केली.
सर्व माहिती ऐकून घेवून मयत शामराव कांबळे यांच्या नातेवाईकांनी ती मान्य केली. मयताची पत्नी रुपाली शामराव कांबळे यांना महिला पदाधिकाऱ्यांनी व महिला नातेवाईकांनी सर्वांच्या समोर हळदी कुंकवाचे ऐक्षण केले व त्यांना मान सन्मान दिला. या अनिष्ट प्रतेस खरंच मूठ माती देऊन नवीन संकल्पना तामगांवातील महीलांनी रुजवली.
विधवांच्या रक्षणासाठी ग्रामपंचायत तामगाव सदैव एक पाऊल पुढे आहे. या कार्यक्रमासाठी प्रभाकर गायकवाड व अमर गायकवाड यांचे सहकार्य लाभले. मयताची नातेवाईक आई – सुनंदा वडील – जींनाप्पा भाऊ सतीश, दीपक, सुंदर, भावजया, लेकी, सुना, नातवंडे, जावई, यांनी संमती दिली. या कार्यक्रमास सरपंच सुरेखा हराळे, ग्रामसेविका सारिका बडंगर, पोलीस पाटील अरविंद कर्णिक, तंटामुक्त समिती अध्यक्ष विश्वास तरटे ग्रा.प.सदस्या गायत्री गायकवाड, दिपाली पाटील यांनी मनोगते व्यक्त केले.
या पुढे गावात अनिष्ट विधवा प्रता निर्मूलन संकल्पना राबवण्याचे ठरवले आहे.या कार्यक्रमाला आवर्जून महीलानी उस्फूर्त प्रतिसाद देत कृतज्ञता व्यक्त केल्या.या वेळी गावचे पोलिस पाटील अरविंद कर्णिक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विश्वास तरटे, सरपंच सूरेखा हराळे , ग्रामसेविका सारीका बंडगर, ग्रा.प.सदस्या गायत्री गायकवाड,
दिपाली पाटील, सामाजिक कार्यकर्ते भिकाजी कांबळे, प्रभाकर गायकवाड, ग्रा.प.क्लार्क संतोष इंगवले चंद्रकांत आडणाईक, अमर गायकवाड,बौध्द समाज अध्यक्ष मधुसूदन कांबळे बौध्द समाज उपाअध्यक्ष राकेश कांबळे, तसेच गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते,व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.