HomeBreakingBreaking | कंधारच्या तलावात बुडून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू...

Breaking | कंधारच्या तलावात बुडून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू…

महेंद्र गायकवाड
नांदेड

नांदेड शहरातील देगलूर नाका भागातील खुदबेनगर येथील पाच जणांचा कंधारच्या जगतुंग तलावात बुडून मृत्यू झाला असून हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले असून घटनेचा पंचनामा करीत आहे.

आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी खुदबेनगर येथील नांदेड येथून क्र. एम.एच.26 बी.डी4531 या ऑटोतुन हे कुटुंब कंधार येथील प्रसिद्ध असलेल्या दर्ग्याच्या दर्शनासाठीआले होते.
यावेळी हे कुटुंब येथील तलावात पोहण्यास गेले असता पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मृत झालेल्या व्यक्तींची नावे खालील प्रमाणे…

मोहम्मद विखार, वय (23)
मोहम्मद साद मोहम्मद शफीउद्दीन, वय(15)
सय्यद सोहेल सय्यद वाहिद, वय (20)
मोहम्मद शफीउद्दीन मोहम्मद गफ्फार, वय(45)
सय्यद नवीद सय्यद वाहिद, वय(15) यांचा मृत्यू असून. कंधारचे पोलीस उपविभागीय अधिकारी थोरात हे पुढील तपास करित आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments