HomeBreakingBreaking | मूर्तिजापूर-दुधलम गावात बाप-लेकाची निर्घृण हत्या !...तर आई गंभीर जखमी...

Breaking | मूर्तिजापूर-दुधलम गावात बाप-लेकाची निर्घृण हत्या !…तर आई गंभीर जखमी…

मूर्तिजापूर येथून जवळच असलेल्या व पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दुधलम या गावात दोघांची हत्या झाल्याने खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गावातील पंडित कुटुंबामध्ये वाद होऊन दोघांचा जागीच मृत्यू तर एक जखमी झाले तर जखमीला मूर्तिजापूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुधलम येथील पंडित कुटुंबामध्ये आज् रात्री नऊ वाजता घरगुती वाद झाला. या वादात प्रताप विठ्ठल पंडित 52 वर्ष व सुरज प्रताप पंडित 26 वर्ष यांचा रॉड व दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.

तर अनिता प्रताप पंडित वर्ष 45 ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथे आणण्यात आले कॉल. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.पुढील तपास पिंजर पोलीस स्टेशन करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments