Thursday, April 18, 2024
Homeगुन्हेगारीबुलढाणा | शिवसेना व शिंदेगटात तुफान हाणामारी…नवनियुक्त कार्यकर्त्यांचा सुरु होता सत्कार समारंभ…

बुलढाणा | शिवसेना व शिंदेगटात तुफान हाणामारी…नवनियुक्त कार्यकर्त्यांचा सुरु होता सत्कार समारंभ…

Share

नरेंद्र खेडेकर, जालिंदर बुधवत यांना धक्काबुक्की, मेहेत्रे- संजय हाडे यांना मारहण

बुलढाणा – शिवसेना आणि शिंदे गटातील भांडण आता मुद्द्यांवरून गुद्यांवर पोहोचले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत् सुरु असलेल्या कार्यक्रमावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला. याठिकाणी नवनियुक्त कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ सुरु होता. यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांना धक्काबुक्की करण्यात आली. विशेष म्हणजे तगडा पोलीस बंदोबस्त असताना हा हल्ला झाला. संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी सांगितले की हल्ला करणाऱ्यात आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते.

यासंदर्भात अनेक व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत, ज्यात कुणाल गायकवाड स्पष्ट दिसत आहेत. जवळपास 15 मिनिटे हा प्रकार चालला. पोलीस बघ्याची भूमिका घेऊन होते, असा आरोप शिवसेनेने केला आहे. खुर्च्यांची फेकाफेक करण्यात आली. लाथा बुक्क्या मारण्यात आल्या. संजय हाडे यांच्या पोटात लाथ घालण्यात आली. छगन मेहेत्रे यांनाही मारहाण झाली. घटने नंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाली. हल्ला करून शिंदे गटातील सैनिक निघून गेले. दरम्यान पोलीस काय करत होते ? हा प्रश्न शिवसैनिक उपस्थित करीत आहेत.

आ.संजय गायकवाड यांनी घडलेल्या घटनेचा निषेध करण्यास मनाई केली असून अप्रत्यक्ष त्यांनी या घटनेचं समर्थन करण्याची भाषा वापरली आहे ,तुमचा पक्ष आहे तो कसा वाढवायचा ते तुम्ही ठरवा मात्र आमचा नामोल्लेख टाळा , अन्यथा अजूनही परिणाम मोठे होतील अशी धमकीच आ.गायकवाड यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचं म्हटलं जातं आहे…

आ संजय गायकवाड बाईट-(शिंदे गट)

तर शिवसेना गटाच्या काही प्रतिक्रिया आल्या आहेत त्यात माजी जिल्हाप्रमुख छगन मेहेत्रे यांनी म्हटलं आहे की आमचा कार्यक्रम हा बंदिस्त हॉल मध्ये होता आणि शांततेत सुरू होता , अचानक आम.संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड हे आपल्या समर्थकांसह हॉल मध्ये आले व त्यांनी तोडफोड व मारहाण करायला सुरुवात केली व बाळासाहेबांचा फोटो पाडला तर खुर्च्या तोडल्या , आमच्या काही नेत्यांना धक्काबुक्की करण्यात आली असून ,पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वारावर या लोकांना अडवलं असत तर ही घटना घडली नसती , विचारांची लढाई विचारांनी लढले पाहिजे असं ही ते म्हणाले…


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: