Saturday, April 20, 2024
HomeMarathi News Todayरामटेक | सायकल प्रवास करून केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा...

रामटेक | सायकल प्रवास करून केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा…

Share

राजु कापसे
रामटेक

रामटेक – शरीराला यातना दिल्याशिवाय हाती घेतलेले काम पूर्णत्वास येत नाही. ते मग गुलामगिरीतून काढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे असो, स्वातंत्र्य वीरांचे असो,संतांचे असो, देशभक्तीने ओतप्रोत झालेल्या राजकारणी पुरुषांचे असो वा समाजसेवकांचे असो. माझ्या मुलाच्या प्रेरणेने मी त्यास घेऊन असच आपल्या आवडत्या क्षेत्रात काही करण्याचं ठरवलं. बेत रचला.

रामटेक ते यवतमाळ सलग चोवीस तास सायकल चालवून जाणे आणि परत येणे करायचे. बॅकअप साठी कार मध्ये Crew members म्हणून कायम उत्साही असणारी माझी पत्नी डॉ अंशुजा, श्रेया तिचा भाऊ गौरव डामरे आणि दोन जास्तीच्या सायकल आडी- अडचणी करिता सोबत घेतले. १४ ऑगस्ट सकाळी ४:४५ ला अठरा भुजा गणेश मंदिर रामटेक ला नमस्कार करून सायकल चालवीत नागपूर ला ७:३० ला पोहचलो जिथे टायगर ग्रूप ऑफ adventures यांनी आमचे स्वागत करून आपल्या सदस्यांना सायकलनेच घेऊन बुटीबोरी इथपर्यंत सोडले. तिथून थेट पवनार गाठले जिथे आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमास अभिवादन करून सेवाग्राम ला गांधीजींच्या कुटीला प्रणाम करीत वर्धा येथे दुपारी दोन वाजता दरम्यान पोहचलो. तिथे संत तुकडोजी महाराज चौकमध्ये ABVP च्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

तिथून देवरी मार्गे कळंब ला पोहचलो. सरपंच संघटनेचे अध्यक्ष वानखेडे यांनी कार्यकर्त्यांसोबत आमचे जंगी स्वागत केले. कळंब गणपतीला वंदन करून यवतमाळ ला रात्री ८:३० वाजता पोहचले जिथे ४५ ते ६५ वर्षाच्या तरुणांनी यवतमाळ बाहेरूनच सगळ्यांनी सायकल चालवत यवतमाळ नगर परिषद कार्यालयात नेले. मुख्याधिकारी श्रीमती माधुरी मडावी मॅडम आणि ठाणेदार केदारे सर यांनी आमचे स्वागत केले.

रेस्ट हाऊस ला फ्रेश होऊन रात्री ११ च्या दरम्यान परतीचा प्रवास सुरू केला. सकाळी ७:३० ला नागपूरला पोहचलो. बुटीबोरी येथे पुन्हा टायगर ग्रूप ऑफ adventures सायकलने आमची वाट पाहत होते. झेंडावंदन इत्यादी करीत त्यांचेसोबत सकाळी ११:३० वाजेपर्यंत वेळ घालवला. रामटेक ला दुपारी २ वाजता परतलो जिथे मित्रांनी वाजागाज्यात हार फुलांनी स्वागत केले.
असे उत्साही मंडळी वेळा वेळात भेटत गेली तर थकवा, झोप जवळ येत आणि हे खरं आहे. या २४ तासात २०-२० मिनिटांचे दोन ब्रेक घेऊन झोप उडविली तर खाण्या पिण्याचे ५-५ मिनिटांचे आवश्यक वेळेस ब्रेक घ्यावे लागले.

उपक्रमाचा उद्देश:-
१) स्वातंत्र्य वीरांना श्रद्धांजली
२) स्वच्छ्ता, आरोग्य, गावाचे सौंदर्यीकरण ला महत्त्व देणे
३) प्रदूषण नियंत्रण
४) सायकल चालविण्यासाठी प्रेरित करणे


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: