सांगली – ज्योती मोरे
सुरज फाउंडेशन कुपवड एमआयडीसी येथे आज दिनांक 5 जून 2022 रोजी पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात आला याप्रसंगी नव कृष्णा व्हॅली गुरुकुल वसतिगृह मार्फत 200 झाडे सुरज फाउंडेशनच्या परिसरामध्ये प्रामुख्याने उलटा अशोक सप्तपर्णी सोनचाफा कनेरी मोगरा गुलाब रातराणी बकुळी अशा अनेक प्रकारची झाडे विद्यार्थ्यांच्या हस्ते लावण्यात आली आहेत . यावेळी नव कृष्णा व्हॅली वसतिगृह इन्चार्ज मा. श्री संतोष बैरागी सर, सुरज स्पोर्ट्स अकॅडमीचे इन्चार्ज श्री विनायक जोशी त्याचबरोबर नव कृष्णा व्हॅली स्कूलचे विद्यार्थी व शिक्षक, रोहन पाटोळे व सुनील धनगर, सुभेदार सुभाष जाधव उपस्थित होते
सुरज फौंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली बाँट्यानिकल गार्डन येथे 500 झाडे स्पेशल बांबू गार्डन म्हणून हा उपक्रम काही दिवसात राबविण्यात येणार आहे. सुरज फाउंडेशन मार्फत प्रतिवर्षी असे नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असतात त्यासाठी संस्थेचे संस्थापक प्रवीणजी लुंकड व सचिव एन जी कामत यांचे नेहमीच मार्गदर्शन असते. अशाप्रकारे सुरज फाउंडेशन मार्फत आजचा पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.