Homeराज्यकोगनोळी येथील दत्तगुरु पतसंस्थेचा सहावा वर्धापनदिन साजरा...

कोगनोळी येथील दत्तगुरु पतसंस्थेचा सहावा वर्धापनदिन साजरा…

कोगनोळी ; प्रतिनिधी…

कोगनोळी ता.निपाणी येथील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या येथील दत्तगुरु क्रेडिट सौहार्द संस्थेचा सहावा वर्धापनदिन शुक्रवार दि. १९ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रारंभी संस्थेचे संचालक अनिल खोत यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. तर डॉ. अंकित उपाध्ये यांनी पौरोहित्य केले.स्वागत व प्रास्ताविक बँकेचे मॅनेजर विद्यासागर बाळीकाई व सहाय्यक व्यवस्थापक विजय खोत यांनी केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती.यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन सचिन खोत व कार्याध्यक्ष निलेश खोत यांनी मान्यवरांकडून शुभेच्छा स्वीकारल्या.या वर्धापन दिनानिमित्त माजी जि.पं.उपाध्यक्ष पंकज पाटील यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी ग्रा.पं.अध्यक्षा छाया पाटील, उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, प्रकाश कदम, कुमार पाटील, युवराज कोळी, प्रकाश गायकवाड, विठ्ठल मुरारी-कोळेकर, शिवाजी खोत, अनिल चौगुले, जगन्नाथ खोत, प्रविण पाटील, रामचंद्र कागले, मधुकर पाटील-मोरेवाडीकर तात्यासो कागले,के डी पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सभासद, हितचिंतक व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments