नागपूर – शरद नागदेवे
“जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ नागपूर एलिट आणि रोटरी क्लब ऑफ नागपूर फोर्ट यांनी महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या संयुक्त विद्यमाने 14 जून 2022 रोजी वोक्हार्ट हॉस्पिटलच्या मागे, धनवटे सभागृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात सर्व रक्तदात्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराच्या आयोजनासाठी रेनबो ब्लड अँड कॉम्पोनंट बँकेच्या टीमने अमूल्य सहकार्य केले.
या दिनाच्याऔचित्याने, प्रख्यात पोषणतज्ञ आणि वेलनेस प्रशिक्षक रोटे. वंदना मिश्रा यांनी BMI (बॉडी मास इंडेक्स) मूल्यांकन शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना त्यांच्या सद्य आरोग्य स्थितीचे मूल्यमापन करून मिळाले. तसेच नागरिकांना संतुलित आहार घेण्याचा सल्लाही देण्यात आला.
रोटे. शुभंकर पाटील, अध्यक्ष, रोटरी क्लब नागपूर एलिट, रोटे. वैशाली बारई, अध्यक्ष, रोटरी क्लब नागपूर फोर्ट आणि प्रकल्प संचालक रोटे. वंदना मिश्रा यांनी या शिबिराच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.
रोटे. अजय पाटील, रोटे. शिवांगी गर्ग, लीना दखणे, संगीता जेजानी, देवांश मिश्रा, कविश दखणे, रोटे. जयंत वरणकर, रोटे. प्रमोद मिसाळ, रोटे. सुरेश बैसवार, रोटे. ग्रुप कॅप्टन अनिल आंबटकर, डॉ. सरोज देसाई, रोटे. विनय, डॉ. सुरज भाऊ, डॉ. नन्नावरे, रोटे. रौनक सिंग कांदे यांच्यासह रेनबो रक्तपेढीचे डॉक्टर आणि तंत्रज्ञ यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.