Saturday, April 20, 2024
Homeराज्यअकोला-आकोट रेल्वे वेळापत्रकात बदल...फेऱ्यांमध्येही झाली वाढ…

अकोला-आकोट रेल्वे वेळापत्रकात बदल…फेऱ्यांमध्येही झाली वाढ…

Share

आकोट संजय आठवले

अकोला आकोट रेल्वे मार्ग सुरू झाल्याने शहरात आनंदाच्या उकळ्या फुटल्या. परंतु ह्या रेल्वे फेऱ्यांचा वेळ अतिशय असुविधाजनक असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यामुळे ह्या फेऱ्यांच्या वेळात बदल करण्याची जोरदार मागणी होती. त्या मागणीची पूर्तता झाली असून पूर्वीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यासोबतच फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे.

आता अकोला येथून ही रेल्वे सकाळी ७.०० वाजता निघून आकोट येथे ८.२० वाजता पोहोचेल. तेथे ४० मिनिटांच्या विश्रामानंतर ही रेल्वे सकाळी ९.०० वाजता आकोट वरून निघून अकोला येथे सकाळी १०.२० वाजता पोचणार आहे. त्यानंतर अकोला येथून दुपारी १०.३० वाजता निघून ही रेल्वे आकोट येथे १२.५० वाजता पोहोचणार आहे. तेथे २ तास १० मिनिटांचा थांबा घेतल्यावर ही रेल्वे आकोट वरून दुपारी २.०० वाजता निघून अकोला येथे दुपारी ३.०० वाजता पोचणार आहे. त्यानंतर अकोला येथून ही रेल्वे सायंकाळी ६.०० वाजता निघून आकोट येथे रात्री ७.२० वाजता पोहोचेल. तिथे चाळीस मिनिटांचा थांबा घेतल्यावर ही रेल्वे रात्री ८.०० वाजता निघून अकोला येथे रात्री ९.२० वाजता पोहोचणार आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: