पनवेल शहर पोलिसांनी घेतली रुग्णालयातील दांपत्याची भेट…
रायगड – किरण बाथम
पनवेल शहरातील सोहेल ढेपे व शाहिस्ता ढेपे दांपत्याने आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला… एका बांधकाम व्यावसायिकाने त्यांना ठगविल्यामुळे आणि कोरोनाच्या महामारीमुळे जीवन जगणे मुश्कील झाले…. आपले 27 लाख रुपये परत मिळावेत म्हणून या दांपत्याने बांधकाम व्यावसायिक शाहनवाज मिया पटेल यांच्याकडे आटोकाट प्रयत्न केले…. मात्र या बांधकाम व्यावसायिकाने त्यांना पैसे देणार नसल्याचे सांगताच आता आपले सर्व काही संपले…
असेच त्यांना वाटू लागले…. अखेर एक व्हिडिओ काढून या इसमाने फिनाइल हे विषारी औषध पिवून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला… या घटनेनंतर त्यांना पनवेलमधील एका खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिरावली असल्याचे वृत्त सूत्रांकडून समोर आले आहे.संबंधित बिल्डर शहानवाज पटेल व अशफाक पटेल यांच्यावर पनवेल पोलिसांनी अजूनही कोणतीच कारवाई केलेली नाही.