HomeMarathi News Todayतामगावच्या ग्रामसभेत अतिक्रमण वरून खडाजंगी…

तामगावच्या ग्रामसभेत अतिक्रमण वरून खडाजंगी…

कोल्हापूर प्रतिनिधी-राजेंद्र ढाले

तामगाव ता.करवीर येथील ग्रामपचायतीची ग्रामसभा गावात विविध ठिकाणी केलेल्या अतिक्रमण या मुद्द्यावरून बाचाबाची व गोंधळ घालण्यात आला गावातील अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली सरपंच सुरेखा लक्ष्मण हाराळे व उपसरपंच महेश तानाजी जोधळेकर यांच्या प्रमुख उपस्थितत झालेली ग्रामसभा आक्रमकतेमुळे वादांची ठरली…

गावठाण व गायरान ठिकाणी काही पुढाऱ्यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करत वादाला सुरुवात झाली. दरम्यान तंटामुक्ती अध्यक्षपदावरून किरकोळ वाद वगळता मार्ग काढुन महेश पिंपळे यांची एकमुखाने तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

बिरोबा माळ येथील गायरान जागेत नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधली असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला मात्र मात्र अतिक्रमण केलेल्या महिलांनी घरे पाडण्यास तीव्र विरोध केला पहिल्यांदा गावठाणातील अतिक्रमण हटवा मगच आमची घरे पाडा असा पवित्रा घेतला गावातील सासने मळा येथील मराठी शाळेत अनेक वर्षापासून बंद असलेल्या खोलींचा वैयक्तिक कामासाठीचा वापर करणे गावातील ग्रामदैवत हनुमान मंदिर वर कळस का लावला नाही या मुद्द्यावरून देखील हामरीतुमरी पुन्हा एकदा ग्रामसभेला गोंधळ घालण्यात आला.

यावेळी सरपंच उपसरपंच सह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य पोलीस पाटील अरविंद कर्णिक महेश पिंपळे अनिल दिपाली पाटील भागुबाई हराळे दादासो खोत विश्वास तरटे प्रसाद काटकर दिपाली कुंभार माजी सरपंच राजेंद्र पांवडे सुधीर कांबळे माजी उपसरपंच हेमंत पाटील अमर शिंदे दादासो मोहोळकर ग्रामविकास अधिकारी दिपाली यादव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments