Friday, April 19, 2024
HomeHealthबालकांच्या निरोगी आयुष्यासाठी स्वच्छता अत्यावश्यक...जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर...

बालकांच्या निरोगी आयुष्यासाठी स्वच्छता अत्यावश्यक…जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर…

Share

महेंद्र गायकवाड
नांदेड
बालकांमध्ये जंताच्या प्रादुर्भावामुळे कुपोषण व रक्तक्षयाची समस्या निर्माण होऊन त्यांना मोठ्या प्रमाणात थकवा जाणवतो. त्यामुळे त्यांची शारीरिक वाढ व मानसिक विकास पूर्णपणे होत नाही. त्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या घरातील 1 ते 19 या वयोगटातील बालकांना स्वच्छतेचे महत्व समजून सांगावे. निरोगी जीवन जगण्याचा कानमंत्र द्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांनी केले.

जिल्हा रूग्णालय येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.एच के साखरे , डॉ. मनुरकर, बालरोग तज्ज्ञ डॉ. विजय पवार, मेट्रन श्रीमती जाधव, नरवाडे, जयश्री वाघ, तसेच कार्यालयीन सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या मोहिमेचे “जंतापासून मुक्त, होतील मुले सशक्त” हे ब्रीद वाक्य आहे. ही मोहिम जिल्ह्याअंतर्गत सर्व शासकीय आरोग्य संस्थामध्ये राबविण्यात येत आहे. 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व बालके व किशोरवयीन मुला-मुलीस जिल्ह्यांतर्गत संपूर्ण शासकीय आरोग्य संस्थेच्या माध्ययमातून जंतनाशक गोळ्या देण्यात येत असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली.

चांगल्या आरोग्यासाठी सकाळी लवकर उठणे, नियमित व्यायाम करणे, आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, जेवणापूर्वी व शौचानंतर नियमित साबनाणे हात धुणे, नखे कापणे, नेहमी स्वच्छ पाणी पिणे, खाण्याचे पदार्थ झाकून ठेवणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. ज्या बालकांनी जंतनाशकाचा गोळा घेतल्या नाहीत त्यांनी 15 ऑक्टोबर पर्यत मॉप अप दिनी गोळ्या घेऊन जंतमुक्त व सशक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष सिरसीकर यांनी केले. याप्रसंगी धनश्री गुंडाळे यांनी जंतनाशक गोळ्या विषयी समुपदेशन केले.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: