HomeFeaturedराज्यदानापूर प्रेस क्लबच्या वतीने माजी सैनिक पुंडलीकराव घायल यांचा स्मृती दिन साजरा...

दानापूर प्रेस क्लबच्या वतीने माजी सैनिक पुंडलीकराव घायल यांचा स्मृती दिन साजरा…

दानापूर – गोपाल विरघट

दानापूर येथिल विनयकुमार घायल यांच्या निवासस्थानी भारतरत्न महामहिम राष्ट्रपती डॉ ,ए, पी ,जे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी तर येथिल माजी सैनिक तथा जेष्ठ पत्रकार स्व.पुंडलीकराव घायल यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला.

यावेळी सर्वप्रथम महामहिम राष्ट्रपती डॉ, ए, पी ,जे अब्दुल कलाम व स्व: पुंडलीकराव घायल यांच्या प्रतिमेचे जेष्ठ नागरिक प्रल्हाद घायल ,व जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष सुभाष रौदळे ,यांच्या हस्ते पूजन व हारार्पण करण्यात आले .यावेळी डॉ , ए, पी ,जे अब्दूल कलाम माजी सैनिक तथा जेष्ठ पत्रकार स्व.पुंडलीकरावजी घायल यांच्या जीवन कार्यावर यावेळी मान्यवरांनी प्रकाश टाकला.

यावेळी कार्यक्रमाला प्रेस क्लबचे अध्यक्ष सुनिलकुमार धुरडे, उपाध्यक्ष शे, राजू ,शे ,नबी, सचिव रविंद्र ढाकरे ,प्रसिद्धी प्रमुख सखाराम नटकूट, सदस्य नंदकिशोर नागपुरे, गोपाल विरघट , श्रीकांत येवतकार, अमोल गौर, विनय जवंजाळ, वैभव दाते, व फ्रेंड सर्कलचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन पत्रकार संजय हागे तर आभार पत्रकार सखाराम नटकूट यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments