सांगली – ज्योती मोरे
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिका क्षेत्रातील प्रभाग 8 मधील सत्यसाईनगर येथील पाटील घर ते गौडर घर येथील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम नगरसेवक विष्णू माने यांच्या स्थानिक विकास निधीतून चालू केले आहे. नगरसेवक माने यांनी या कामाची पाहणी केली व ठेकेदारास उत्तम दर्जाचे काम करण्याची सूचना दिली.