अमरावती – “आझादी का अमृत महोत्सव” च्या अनुषंगाने महानगरपालिके तर्फे नेहरु मैदान येथील शहीद स्मारकाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. आज महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर यांनी त्याची पाहणी केली.

झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करतांना उर्वरीत कामासाठी निधीची उपलब्धता करुन देण्यात येईल असे यावेळी सांगीतले. पाहणी करतांना त्यांनी क्रांती ज्योत येथे प्रकाश व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. सदर परिसर अत्यंत सुंदर असून या परिसरातील इतर कामांनाही त्वरीत पुर्णत्वास नेण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या.
याप्रसंगी स्वातंत्र्याच्या लढ्यात शहीद झालेल्या बांधवांची आठवण राहावी म्हणून क्रांती ज्योत निर्माण केली असून त्याचे खरे जतन महानगरपालिकेने केल्यामुळे आयुक्तांनी उपस्थित अधिका-यांचे व कर्मचा-यांचे कौतुक केले. या ठिकाणी येणा-या काळात अजून कोणता विकास करता येईल याचे नियोजन करण्याचे निर्देश संबंधीत अधिका-यांना यावेळी दिले.

या पाहणी दौ-यात उपायुक्त डॉ.सिमा नैताम, शिक्षणाधिकारी डॉ.अब्दुल राजीक, उपअभियंता सुहास चव्हाण, शाखा अभियंता अजय विंचुरकर, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, शाळा निरीक्षक उमेश गोदे, वहीद खान पठाण, गोपाल कांबळे, मुख्याध्यापक सुभाष कुर्मी उपस्थित होते.