Saturday, April 20, 2024
Homeकृषीरयत संघटनेतर्फे निपाणी तहसिलदारानां निवेदन…पीक नुकसान भरपाई त्वरित मिळावी…राजू पोवार

रयत संघटनेतर्फे निपाणी तहसिलदारानां निवेदन…पीक नुकसान भरपाई त्वरित मिळावी…राजू पोवार

Share

प्रतिनिधी ; राहुल मेस्त्री…

कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या वतीने चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजु पोवार यांच्या नेतृत्वाखाली निपाणीचे नुतन तहसीलदार प्रवीण कारंडे यांना निपाणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन,मका,भूईमुग,भात, ऊस व इतर कडधान्ये आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा ताबडतोब.पंचनामा करून शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी या मागणीचे निवेदन दि.23 रोजी देण्यात आले.

सदर निवेदन तहसीलदार प्रवीण कारंडे यांनी स्वीकारून वरिष्ठापर्यंत पोचवून तात्काळ भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.यावेळी बोलताना राजु पोवार म्हणाले गेल्या दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे घरांचे आणि पिकांचे नुकसान होऊनही त्याची दखल घेतलेली नाही.तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे नुकसान झाले आहे. पण आज पर्यंत प्रशासनातर्फे नुकसानीचा पंचनामा झालेला नाही. त्यामुळे तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा नुकसानग्रस्तांचा लढा उभारला जाईल असा इशारा पोवार यांनी दिला आहे.

याप्रसंगी रयत संघटनेचे कार्याध्यक्ष रमेश पाटील, शहर अध्यक्ष उमेश भारमल, उपाध्यक्ष सर्जेराव हेगडे, सेक्रेटरी भगवंत गायकवाड,हालाप्पा ढवणे, सुनील गाडिवड्डर, विजय गुरव, कुमार पाटील, बाबासाहेब पाटील, बबनराव जामदार, पवनकुमार माने,शिवगोंड निकम, रमेश गळतगे, अनंत पाटील, रमेश भोसले, चिनू कुळवमोडे,बाळूअण्णा, पाटील, राजाराम पाटील, शिवाजी वाडेकर,बाळू कांबळे, विठ्ठल रजपूत, संजय नाईक,एकनाथ सादळकर, तानाजी पाटील, सदाशिव शेटके
यांच्यासह ग्रामीण भागातील रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: