सांगली – ज्योती मोरे
भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव शेखर इनामदार, संघटक सरचिटणीस दीपक माने, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष धीरज सूर्यवंशी, नगरसेवक गजानन मगदूम, अल्पसंख्यांक प्रदेश चिटणीस अश्रफ वांकर, धनेश कातगडे, सुरज शिंगे, गणपती साळुंखे, मुकुंद कांबळे, रणजीतसिंह गायकवाड आदी उपस्थित होते.