Friday, March 29, 2024
Homeराजकीयभोसे मधील स्टोन क्रेशर प्रकरणात पालकमंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र...

भोसे मधील स्टोन क्रेशर प्रकरणात पालकमंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र…

Share

सांगली – ज्योती मोरे.

मिरज तालुक्यातील भोसे हद्दीत सुरू असलेल्या स्टोन क्रशरवरून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत.वास्तविक सदरच्या स्टोन क्रशरबाबत कोणीही रीतसर तक्रार केलेली नाही. क्रशरमधून उडणाऱ्या धुरळ्याबाबत यापूर्वीच दखल घेतली आहे. त्यातूनही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तर भरपाईची ही तयारी ठेवली असताना, राजकीय हेतूने प्रेरित काही लोक पत्र पालकमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

त्यामध्ये त्यांचे कोणतेही हितसंबंध नाहीत असे स्पष्ट करण क्रशर चालक सागर वडगांवे,सागर वनखंडे,सुधीर बाबर आणि प्रशांत खाडे यांनी पत्रकार अशी बोलताना केले.भोसे हद्दीत गेल्या चार वर्षापासून आमचे स्टोन क्रेशर सुरू आहे, आमच्याबरोबर या भागात अन्य दोन क्रशर ही सुरू आहेत. या क्रशर मधून धुरळा येतो हे नाकारता येत नाही पण तो नियंत्रणात आणण्यासाठी आमच्याकडून सर्वोतोपरी प्रयत्न झाले आहेत. क्रशर परिसरबंद करण्याबरोबर सतत पाणी मारणे सुरू असते.

वास्तविक शेतकऱ्यांना क्रशरचा त्रास होत असल्याने ते इतरत्र हलविण्याच्या दृष्टीने शिवाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने आमचे सकारात्मक भूमिका राहिली आहे, असे असतानाही या प्रकाराला राजकीय संदर्भ जोडून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यांना याबाबत कोणतीही कल्पना नाही किंवा त्यांच्याकडे कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार दाखल नाही, असे असताना त्यांना बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असे ही वडगांवे, वनखंडे, बाबर आणि खाडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आजही शेतकऱ्यांना याबाबत पुढे येऊन होणाऱ्या त्रासाबाबत चर्चा करण्यासाठी आवाहान केले आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान व्हावे अशी त्यांची आपण आणि आमची भूमिका नाही. पण यातून पालकमंत्र्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये अन्यथा ज्या त्यावेळी जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: