Wednesday, April 24, 2024
Homeगुन्हेगारीसायबर पोलिस ठाण्याकडून सांगलीतील आप्पासाहेब बिरनाळे फार्मसी कॉलेज मध्ये सायबर जागरूकता दिवस...

सायबर पोलिस ठाण्याकडून सांगलीतील आप्पासाहेब बिरनाळे फार्मसी कॉलेज मध्ये सायबर जागरूकता दिवस साजरा…

Share

सांगली – ज्योती मोरे

सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाकडून राबवल्या जाणाऱ्या इंडियन सायबर क्राईम कॉर्डिनेशन सेंटर या योजने अंतर्गत सायबर जागरूकतेचा प्रसार व्यापक रितीनं साजरा करावा यासाठी आज सायबर जागरूकता दिवस साजरा करण्याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र सायबर मुंबई यांच्या आदेशानं सांगली सायबर पोलीस ठाण्याकडून आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसी येथे सायबर जागरूकता दिवस साजरा करण्यात आला.

पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली,अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक सतिश शिंदे, पोलिस उपनिरीक्षक रोहिदास पवार, पोलीस अंमलदारअमोल क्षिरसागर, सचिन कोळी, सायबर पोलीस ठाणे यांनी सदरचा कार्यक्रम आयोजित केला होता.

दरम्यान सोशल मीडियाचा वापर पालकांनी महिला आणि मुलींचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत, यासह इतर बाबतीत कोणती काळजी घेतली पाहिजे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. तांबोळी,अमोल पाटील, फिरोज शेख,जमादार तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: