तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरात अवकाळी पावसाने केळी बागेचे केले नुकसान…

0
257

दानापूर – गोपाल विरघट

दानापूर तालुक्यातील येथे मोठया प्रमाणावर केळी लागवड केली जाते. काल सायंकाळी तेल्हारा तालुक्यातील दानापूर परिसरावर मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातले. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला मात्र पावसा सोबत असलेल्या जोरदार हवे मुळे केळीबागांचे तर लोकांच्या घरावरील टिन पत्रे तर काहींच्या गोठयाचे अतोनात नुकसान झाले. केळीबागांचे मोठया प्रमाणात झालेले नुकसान हे केळी उत्पादनात घट होण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

दानापूर सह परिसरात मोठया प्रमाणावर याही वर्षी केळी या पिकांची लागवड केली आहे. गेल्या 15 दिवसा अगोदर अति तापमानेने केळी बागा सुकल्या होत्या तर केळीला आग लागल्याचे चित्र होते. मात्र वातावरणात अचानक झालेला बद्दल व मान्सून पूर्व पाऊस व जोरदार आलेल्या वादळी वाऱ्याने दानापूर परिसरातील केळी पिकें ही जमीनदस्त झाल्याने फार मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सदर नुकसानीचा सर्व्ह दानापूर चे तलाठी अंकुश मानकर व कृषी साह्ययक श्री, महेश इंगळे यांनी झालेल्या नुकसान पाहणी केली यावेळी 100 ते 120 हेक्टर वर अंदाजे नुकसान झाल्याचा अहवाल वरिष्ठांना अहवाल सादर केल्याचे यावेळी सांगण्यात आले. यामध्ये शेतकरी, भावना राऊत, कासाबाई घायल, सुरेश रौदळे, श्रीराम डाबरे,कपिल घायल, बाबाराव खवले, रामकिशोर घायल, पंकज विखे, विश्वास विखे, वसंता चंवडकार, आदि शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

दानापूर, सौंदळा रस्ता बंद
अचानक आलेल्या पावसाने व जोरदार वादळी वाऱ्याने दानापूर सौंदळा रस्त्यावरील झाडे उलमडून पडली यामध्ये दिपक ठाकूर यांच्या दुचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले असून या रस्त्यावर मोठया प्रमाणावर झाडे पडल्याने वाहतूक बंद होती.

कोड 1) 2 एकरातील केळी बाग झोपली
मी लाखो रुपये खर्च करून केळी बाग वाढवली मात्र झालेल्या पावसाने व वादळी वाऱ्याने माझी केळी बाग झोपली 15 क्विंटल रु प्रति चा भाव आहे. परिपक्व झालेली केळी काढणीस आली होती. मात्र आता केळी चा माल नसल्याने लागलेला खर्च सुद्धा निघणार नाही.

सुनिल राऊत केळी उत्पादक शेतकरी

कोड 2) दि ,9 रोजी सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने केळी पिकांचे नुकसान झाले असून केळी पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संदर्भातील माहिती वरिष्ठांना पाठवली आहे. अंकुश मानकर तलाठी दानापूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here