Homeगुन्हेगारीकोगनोळी येथील सिमेंट विट कारखान्यात ट्रँक्टर व ट्रेलरची धाडसी चोरी…

कोगनोळी येथील सिमेंट विट कारखान्यात ट्रँक्टर व ट्रेलरची धाडसी चोरी…

कोगनोळी; प्रतिनिधी…

कोगनोळी ता.निपाणी येथील पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग,न्यु इग्लिश मिडीयम स्कुल नजीक असणाऱ्या सिमेंट विट कारखान्यातील ट्रँक्टर आणि ट्रेलरची धाडसी चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना बुधवार दि.24 रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत अधिक माहिती अशी की पांडुरंग जाधव रा.सुळकुड ता.कागल यांचा कोगनोळी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्ग न्यु इग्लिश मिडीयम स्कूल नजीक सिमेंट विटेचा कारखाना आहे.या कारखान्यात काम करणारा मजूर गेल्या काही दिवसांपासून आपल्या गावी गेल्याने सध्या याठिकाणचे सिमेंट विट उत्पादन बंद असुन ट्रँक्टर ,ट्रेलर आणि यासाठी लागणारे इतर साहित्य गेटच्या आत होते.याचाच फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी मंगळवार दि.23 रोजी रात्री ही धाडसी चोरी केल्याची माहिती समोर आली असुन हे चोरटे महाराष्ट्राच्या दिशेने गेल्याचा अंदाज प्रथमदर्शी व्यक्त केला जात आहे.

या घटनेनंतर या कारखान्याचे मालक पांडुरंग जाधव यांनी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या प्रकारामुळे नजीकच्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे या चोरट्यांनी शोधण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.या चोरीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments