Homeगुन्हेगारीमहाखनिज प्रणालीचा वापर करुन फसवणूक केल्याप्रकरणी गून्हे दाखल करण्याची मागणी...आकोट उपविभागिय अधिकारी...

महाखनिज प्रणालीचा वापर करुन फसवणूक केल्याप्रकरणी गून्हे दाखल करण्याची मागणी…आकोट उपविभागिय अधिकारी यांची भूमिका महत्वाची….

संजय आठवले आकोट

आकोट शहरातून गौणखनिज वाहतूक करताना पकडलेल्या व पोलीस ठाण्यात ऊभ्या केलेल्या ट्रकच्या नावे तब्बल ५ वेळा ETP तयार करुन त्या आधारे गौणखनिजाची वाहतुक केल्या संदर्भात संबंधितांवर शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करणेबाबत जिल्हाधिकारी अकोला यांचेकडे मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी उपविभागिय अधिकारी आकोट यांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान ह्या प्रकरणी तहसिलदार आकोट हे चौकशी करित असुन त्यांचे समक्ष संबंधितांची सुनावणी सुरु आहे.

वाचकास स्मरतच असेल कि, ट्रक क्र. MH 48 J 0121 ह्या वाहनास आकोट शहरातून गौणखनिज वाहतुक करताना उपविभागीय अधिकारी आकोट यानी पकडले होते. सुरक्षेकरिता हे वाहन आकोट पोलीस ठाणे येथे ठेवण्यात आले होते. परंतु असे असताना मौजे गाजीपूर येथिल बाळू सिताब भास्कर यांचे खदानीतुन याच वाहनाचा ETP तयार करण्यात आला. त्याआधारे या खदानीतील गौणखनिज एम. जे. तरडेजा यांचे प्रेरणा स्टोन क्रशरवर अन्य वाहनाने आणण्यात आले. त्याच दिवशी म्हणजे २२.६.२०२२ रोजी हा प्रकार तब्बल ५ वेळा करण्यात आला. त्यानंतर महाखनिज प्रणालीवर पडताळणी केली असता हा प्रकार ऊघडकिस आला.

ह्या सा-या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश तहसिलदार आकोट याना देण्यात आले. त्या अन्वये तहसिलदार आकोट यानी एम. जे. तरडेजा व बाळू सिताब भास्कर याना नोटीसेस बजावल्या आहेत. त्यानुसार तहसिलदार आकोट पूढिल चौकशी करित आहेत.

या दरम्यान हा प्रकार फसवणूकीचा असल्याची चर्चा रंगू लागली. त्यावर ह्या प्रकरणी तरडेजा व भास्कर यानी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी तक्रार जिल्हाधिकारी अकोला यांचेकडे करण्यात आली आहे. या तक्रारीत या फसवणूकीसह अन्य बाबीही नमूद करण्यात आल्या आहेत. गट क्र. ४०/२ हे शेत आदीवासी बाळू सिताब भास्कर यानी अन्य आदीवासीकडून खरेदी केले आहे. ते खरेदी करताना हे शेत आपण कृषी प्रयोजनाकरिता खरेदी करित असल्याचे भास्कर यानी लिहून दिले आहे. मात्र या घडीला ह्या शेतातून गौणखनिज उत्खनन केल्या जात असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. एम. जे. तरडेजा हे बाळू भास्कर याचेकडून कागदोपत्री गौणखनिज विकत घेतल्याचे भासवून त्यावर प्रक्रिया करतात आणि त्याची विक्री करतात.

तरडेजा यानी या पूर्वीही २३०० ब्रास गोणखनिजाच्या वाहतुक पासेसचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तरडेजा यानी सन २०१० ते २०१७ या दरम्यान या २३०० ब्रासचा अतिरीक्त भरणा केलेला आहे. त्यापोटी त्यानी लाखो रुपये रॉयल्टी रिफंड मिळविल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. ह्या सा-या बाबींची चौकशी करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एम. जे. तरडेजा आणि बाळू सिताब भास्कर यांचेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपविभागीय अधिकारी आकोट याना योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश प्राप्त झाल्याचे कळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments