Homeराजकीयखासदार संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ सांगलीतील ठाकरे चौकात शिवसेनेच्या वतीने निदर्शने...

खासदार संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ सांगलीतील ठाकरे चौकात शिवसेनेच्या वतीने निदर्शने…

सांगली – ज्योती मोरे

गोरेगाव मधील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत अटक केल्याच्या निषेधार्थ आज सांगलीतील बाळासाहेब ठाकरे चौकात शिवसेनेच्या वतीने निदर्शने करत भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

दरम्यान राज्यपालांनी गेल्या काही दिवसात ज्या काही वल्गना केल्यात यावरून या भाजपा सरकारला महाराष्ट्राचे पाणी दाखवण्याची वेळ आली आहे. हनीट्रॅप, ईडी, आणि मोठमोठ्या थैल्या देऊन शिवसेनेचे आमदार फोडण्याचे कारस्थान भाजपाने चालवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करत असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख शंभूराज काटकर यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी बजरंग पाटील,अनिल शेटे,सांगली शहर प्रमुख मयूर घोडके, विभाग प्रमुख सुरज पवार, कैलास वडर,तसेच शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments