HomeMarathi News Todayबडनेरा येथील माताफैलात घाणीचे साम्राज्य...महापालिकेचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांचा आरोप...

बडनेरा येथील माताफैलात घाणीचे साम्राज्य…महापालिकेचे दुर्लक्ष असल्याचे नागरिकांचा आरोप…

अमरावती महापालिकेच्या हद्दीत येत असलेल्या बडनेरातील माताफैल पुलाजवळ कचर्‍याची समस्या गंभीर बनली आहे. कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या वेळेवर येत नसल्याने नागरिक उघड्यावरच कचरा टाकत आहेत. त्यामुळे माताफैल येथील नागरिकांचे जगणे कठीण झाले असून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारल्या जात नाही. महापालिका या कडे दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

बडनेरा येथील माताफैलातून जुन्यावस्तीकडे जाणाऱ्या रोडवरील पुलाजवळ घाणीचे साम्राज्य तयार झाले असून येथून ये-जा करणाऱ्या व तसेच परिसरातील नागरिकांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तर रस्त्याच्या बाजूलाच काही बेजबाबदार कचरा टाकत असून येथे भला मोठा कचर्याचा ढीग तयार झाला आहे. तर या ठिकाणी डुकरे आणि कुत्रे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांचा अपघातही या जनावरांमुळे होऊ शकतो.

काही नागरिकांच्या मते घंटागाडी वेळेवर येत नसल्याने अनेक लोक येथे कचरा टाकतात यामुळे या जागेवर कचर्‍याचे ढिगार पहायला मिळतो. यासाठी संबधित महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचे येथील नागरिक म्हणतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments