Homeसामाजिकश्री साईराम ग्रुपच्या वतीने पत्रकार बांधवांच्या हस्ते गरजुंना ब्लँकेटचे वाटप...

श्री साईराम ग्रुपच्या वतीने पत्रकार बांधवांच्या हस्ते गरजुंना ब्लँकेटचे वाटप…

खामगाव – सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या शहरातील श्री साईराम ग्रुपच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवांच्या हस्ते गरजुंना सामाजिक बांधिलकी जपत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.श्री साईराम ग्रुप विविध सामाजिक, धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर राहला आहे. वर्षभर वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, भोजन वाटप, गरजुंना मदत असे समाजपयोगी सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. ग्रुपचे सर्व सदस्य निस्वार्थपणे उपक्रमासाठी सेवा देतात. दरम्यान सध्या हिवाळा सुरू झाला असून चांगलीच थंडीची हुडहुडी पसरलेली आहे.

भर थंडीत शहरात अनेक गोरगरीब उघड्यावर झोपतात. याची जाणीव ठेवत सामाजिक बांधिलकी जपत श्री साईराम ग्रुप च्या वतीने अशा गोरगरीब नागरीकांना ब्लँकेट वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवांचे हस्ते ब्ल्‍ाँकेट वाटप करण्यात आले.

सर्वप्रथम येथील रेल्वे स्टेशन जवळील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महामानवांना अभिवादन करून शहीद दिनानिमित्त शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यानंतर येथील रेल्वे स्टेशन, बस स्थानक, सामान्य रूग्णालय, फरशी, शनी मंदिर आदी परिसरात गरजुंना ब्लँकेट वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments