Thursday, April 25, 2024
Homeराज्यकारगदा, ढोणेवाडी, कसनाळ येथील सरकारी शाळेत म.ए.युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण...

कारगदा, ढोणेवाडी, कसनाळ येथील सरकारी शाळेत म.ए.युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण…

Share

कोगनोळी – राहुल मेस्त्री

प्रत्येक वर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव जिल्हा यांच्या वतीने इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. त्या अंतर्गत काही दिवसांपूर्वी निपाणी भागातील काही गावातील सरकारी शाळेतील शैक्षणिक साहित्याचे वितरण केले होते.

त्याचप्रमाणे पुन्हा एकदा निपाणी तालुक्यातील कारगदा,ढोणेवाडी,कसनाळ आदी गावातील सरकार प्राथमिक शाळेत दि.20 रोजी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाव्दारे विद्यार्थी,पालक यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसते आहे.याप्रसंगी बंडा पाटील,नवनाथ पाटील,लक्ष्मीकांत पाटील ,राहुल पाटील ,राहुल काटे, आदेश पवार ,रणजीत देसाई यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: