Thursday, March 28, 2024
Homeसामाजिकपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत भाजपा महिला मोर्चाच्या वतीने अंगणवाडीतील मुलांना...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत भाजपा महिला मोर्चाच्या वतीने अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप…

Share

सांगली – ज्योती मोरे

देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या वतीने मिरजेत अंगणवाडीतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. स्वातीताई शिंदे व सरचिटणीस तसेच सेवा पंधरवडा प्रमुख वैशालीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजप महिला मोर्चा पूर्व मंडल अध्यक्ष सौ. रूपाली देसाई यांच्यावतीने अंगणवाडी क्रमांक 84 दत्तक घेऊन तिथल्या मुलांना खाऊ वाटप करून,राष्ट्रीय पोषक अभियान राबविण्यात आले.

यावेळी अंगणवाडी प्रमुख पुष्पा कराडे, मदतनीस जयश्री पवार, सीडीपीओ विजयमाला माने,सुपरवायझर म्हेत्रे मॅडम, भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष जयश्रीताई कुरणे, मंडल पदाधिकारी अनघा कुलकर्णी ,नम्रता साठे, सुचिता बर्वे, रश्मी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: