HomeMarathi News Todayडोनाल्ड ट्रम्प यांनी FBIवर केला पासपोर्ट चोरीचा आरोप...दिली ही धमकी...

डोनाल्ड ट्रम्प यांनी FBIवर केला पासपोर्ट चोरीचा आरोप…दिली ही धमकी…

न्यूज डेस्क – FBIने त्यांचा पासपोर्ट चोरल्याचा आरोप अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. एफबीआयने गेल्या आठवड्यात त्यांच्या अलिशान ठिकाणांवर छापे टाकले. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, मार-ए-लागो येथे टाकलेल्या छाप्यादरम्यान त्यांचे तीन पासपोर्ट FBIने चोरले आहेत. या छाप्याला त्यांनी राजकीय षडयंत्रही म्हटले आहे. त्यांनी पुन्हा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवावी अशी डेमोक्रॅटची इच्छा नसल्याचे ते म्हणाले.त्यांनी स्वत: समर्थकांना शांत केले नाही तर संपूर्ण देश पेटून उठेल असेही ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलिशान बंगल्यावर छापा टाकल्यानंतर त्यांचे समर्थक संतप्त झाले असून त्यांनी गृहयुद्धाच्या धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडताना अनेक गुप्त कागदपत्रे सोबत घेतल्याचा आरोप आहे. याबाबत एफबीआयने छापा टाकला. मात्र, एफबीआयला असे कोणतेही दस्तऐवज सापडलेले नाहीत. अद्याप तपास सुरू असल्याचे एजन्सीचे म्हणणे आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, देश अत्यंत धोकादायक परिस्थितीत आहे. असा राग मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. गेल्या वीकेंडला ट्रम्प यांचे अनेक समर्थकही अनेक ठिकाणी शस्त्रे घेऊन जमले होते. यानंतर सरकारने सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर व्हाईट हाऊस सोडण्यापूर्वी टॉयलेटमधील अनेक कागदपत्रे फ्लश केल्याचाही आरोप आहे. त्यामुळे स्वच्छतागृहाचीही कोंडी झाली होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी असे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र याबाबत एजन्सी सातत्याने छापे टाकत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments