Friday, March 29, 2024
Homeविविधगांधीनगर बाजारपेठेमध्ये सणासुदीच्या काळात वीज खंडीत होऊ देऊ नका...करवीर शिवसेना

गांधीनगर बाजारपेठेमध्ये सणासुदीच्या काळात वीज खंडीत होऊ देऊ नका…करवीर शिवसेना

Share

कोल्हापूर प्रतिनिधी-राजेंद्र ढाले

गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड होलसेल व रिटेल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीकल व फर्निचरी प्रमुख बाजार पेठ आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे लोकांनी सण-समारंभ मोठ्या प्रमाणात साजरे केले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत खरेदीही कमी प्रमाणात केली. तसेच गांधीनगर बाजारपेठेतील दुकान गाळ्यांचे भाडेही खूप आहे. त्यामुळे दुकानदारांना आर्थिक घडी बसवताना खूप मोठी कसरत करावी लागत आहे.

सध्या कोरोनाचे नियम शिथिल झाल्यामुळे सण उत्सव हे मोठमोठ्याने साजरे होत आहेत. सध्या हिंदुचा दिवाळी व दसरा हे सण आहे. त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. त्यामुळे दुकानदारांची आता कुठे आर्थिक घडी सुरळीत होत आहे. बाजारपेठेमध्ये सतत वीज खंडीत होत असते. त्यामुळे दुकानदारांना व्यवसाय करण्यासाठी मोठी अडचण होते. सदर सणाला गांधीनगर बाजारपेठे मधील वीज खंडीत होवू नये जरी काही विजेचे काम करायचे असेल तर ते काम जलद गतीने करून बाजार पेठेतील सतत वीज खंडीत होणार नाही या बाबत आपण दक्षता घ्यावी, अन्यथा करवीर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करणेत येईल असा इशारा शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आला.

या मागणीचे निवेदनात करवीर शिवसेनेच्या वतीने मा.अश्विनकुमार सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता, गांधीनगर वीज वितरण कार्यालय यांना देण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी विजेची जी काही काम आहेत ती जलद गतीने पूर्ण करून सणासुदीच्या काळात वीज खंडित होणार नाही याची दक्षता घेऊ, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, योगेश लोहार, सुरेश किल्लेदार, आबा जाधव, बाबुराव पाटील, दिपक अंकल, सुनील पारपाणी, किशोर कामरा, दिपक फ्रेमवाला, शंकर चंदवानी, राजेश सचदेव, भगवान पंजवाणी, जित चावला आदी उपस्थित होते


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: