Friday, April 19, 2024
Homeराज्यदिंडनेर्ली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाला सीसीटीव्ही कँमेरे बसवले…भिम ब्रिगेडच्या वतीने ग्रामपंचायत चे...

दिंडनेर्ली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाला सीसीटीव्ही कँमेरे बसवले…भिम ब्रिगेडच्या वतीने ग्रामपंचायत चे आभार…

Share

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

दिंडनेर्ली ता.करवीर येथील सिद्धार्थ नगर येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गेल्या अनेक वर्षांपासून आहे.याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणून भिम ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सदर पुतळयाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरा बसविण्यात यावे या आशयाचे निवेदन देण्यात आले होते.

या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन दिंडनेर्ली ग्रामपंचायतीने येथील सिद्धार्थ नगर येथे असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात आले आहेत.सदर मागणी कडे ग्रामपंचायतीने त्वरीत लक्ष घातल्याने सचिन कदम यांनी ग्रामपंचायत,गटविकास अधिकारी काकासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य ।या.संभाजी बोटे ,सामाजिक कार्यकर्ते तानाजी पाटील, मा.बाबासो पाटील, बाजार समिती चे संचालक मा.दिगंबर पाटील,ग्रामपंचायत क्लार्क मा.अमित नलगे यांचे आभार मानले.त्यावेळी जिल्हा अध्यक्ष मा.सचिन कदम ,सर्वेश कांबळे ,सागर कांबळे ,आकाश कांबळे उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: