सांगली – ज्योती मोरे
आजआमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रकाश तात्या बिरजे म्हणाले, “जनसंघाचे अध्यक्ष या नात्याने डॉ. शामाप्रसाद मुखर्जींनी काश्मीरमध्ये प्रवेश केला. आपल्या देशाच्या एका राज्यात भारतीयांना प्रवेश करण्यासाठी परवानगी घ्यावी लागले हे लज्जास्पद आहे, असे म्हणून डॉ. मुखर्जींनी आंदोलन केले. अटकेदरम्यान डॉ. मुखर्जींचे निधन झाले.
केंद्रित मंत्री असलेल्या नेत्यावर अटकेची कारवाई सातत्याने संपूर्ण देशात काश्मीर कराराविरुद्ध वातावरण निर्माण झाले आणि केंद्र सरकारने परवानगीची अट काढली. शामाप्रसादांच्या बलिदानामुळे काश्मीर भारतात राहिले, याचे स्मरण सर्व भारतीयांनी ठेवणे गरजेचे आहे” असे उदगार भाजपच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य श्री. प्रकाश बिरजे यांनी काढले. डॉ. शामाप्रसाद मुखर्जींच्या पुण्यतिथी कार्यक्रम आमदार गाडगीळ कार्यालयात झाला.
शहर जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बिरजे, संघटन सरचिटणीस दीपक माने, प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, माजी आमदार नितीन राजे शिंदे, ज्येष्ठ नेते श्रीकांत तात्या शिंदे, माजी महापौर संगीता खोत, नगरसेवक विनायक सिंहासने, संजय कुलकर्णी, लक्ष्मण नवलाई, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमर पडळकर, सविता मदने, माधुरी वसगडेकर, वैशाली पाटील, कोमल चव्हाण, प्रीती मोरे, प्रियानंद कांबळे, अजय वाले, अविनाश मोहिते, प्रमोद जाधव उदय मुळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.