Homeराज्यडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली...

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मार्फत साजरी…

सांगली – ज्योती मोरे.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात येते. या दिनाचे औचित्य साधून नव कृष्णा व्हॅली स्कूल एमआयडीसी कुपवाड येथे आज शिक्षक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर कालिदास पाटील सर यांनी आपली भारतीय संस्कृती किती सर्वोत्तम गोष्टींनी नटलेली आहे व ती किती संग्राहक आहे हे सांगितले, माणसाच्या आयुष्यात शिक्षकाचे स्थान हे ईश्वराच्या स्थानासमान आहे,

शिक्षक हा समाज घडविणारा माणूस रूपी देवच आहे, मनुष्याने कितीही प्रगती केली तरी तो स्वावलंबी नाही तर तो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कुणाच्या ना कुणाच्यावर अवलंबून असतो, मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे, जन्मापासूनच त्याच्यावर आई वडील यांच्यपाठोपाठ शिक्षक किती महत्त्वाचे असतात हे समजावुन सांगीतले,शिक्षक कसा असावा यावर चर्चा करताना शिक्षक हा सर्वव्यापी असावा, ज्ञानासाठी भुकेल्या असलेल्या मुलांना सीमेच्या बाहेर जाऊन ज्ञान देणारा असावा,

भावी पिढी घडवण्यासाठी झटणारा, मुलांना ती जशी आहे तशी शंभर टक्के स्वीकारणारा, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा असावा, असेही त्यांनी सांगितले. त्याच बरोबर त्यांनी स्वानुभव कथा सांगून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी संस्थेचे संस्थापक प्रविण सर यांनी सर्व शिक्षकांना अभिवादन केले,सचिव कामत सर यांनी शिक्षक व विद्यार्थी यांचा परस्पर संबंध कसा आहे,

एक व्यक्ती म्हणून घडताना विद्यार्थ्यांना शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन कसे आवश्यक आहे हे सांगितले,संस्थेचे इंग्लिश मीडियम उपमुख्याध्यापक प्रशांत चव्हाण सरांनी पाहुण्यांची ओळख करून दिली,संस्थेच्या संचालिका संगीता पागनीस मॅडम यांनी पाहुण्यांचे आभर मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.. प्रियंका हिरवाडे व सरिता पाटील यांनी केले,

सर्व शिक्षक व शिक्षकेतर व कर्मचाऱ्यांचा माननीय प्रमुख पाहुणे कालिदास सर व सचिव कामत साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाला नव कृष्णा व्हॅली स्कूल सांगली, मैशाळ,विजयनगर, मेडिकल व आयआयटी,येथील विभाग प्रमुख सुनील चौगुले असलम सनदी अश्विनी माने विनायक जोशी राजेंद्र पाचोरे संतोष बैरागी श्रीशैल मोटगी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात शिक्षकांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments