Homeव्यापारऑडी इ-ट्रॉन बॅटरी मोड्यूल्सकडून भारतात इलेक्ट्रिक रिक्षांना चालना...

ऑडी इ-ट्रॉन बॅटरी मोड्यूल्सकडून भारतात इलेक्ट्रिक रिक्षांना चालना…

मुंबई – जर्मन- भारतीय स्टार्टअप नुनाम भारतीय रस्त्यांवर तीन इलेक्ट्रिक रिक्षा आणत आहे. त्यांना ऑडी इलेक्ट्रॉन टेस्ट फ्लीटमधल्या तपासणी वाहनांमधून वापरलेल्या बॅटरींद्वारे ऊर्जा मिळाली आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट जास्त व्होल्टेज असलेल्या बॅटरींनी बनवलेल्या गाड्यांचा पुनर्वापर कारचे जीवनचक्र संपल्यानंतर कसा करता येईल आणि दुसऱ्या आयुष्याच्या वापराचे एक शाश्वत उदाहरण बनवता येईल हे पाहण्याचे आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट भारतातील महिलांसाठी रोजगाराच्या संधींचे मजबुतीकरण करण्याचेही आहे. त्यांना त्यांच्या मालाची वाहतूक करण्यासाठी ई-रिक्षा दिल्या जातील.

बर्लिन आणि बंगळुरूमध्ये स्थित असलेल्या या ना-नफा तत्वावरील स्टार्टअपला ऑडी एन्व्हायर्नमेंटल फाऊंडेशनने निधी पुरवला आहे. नुनामने ऑडीच्या नेकरसुल्म साइटवर ट्रेनिंग टीमसोबत तीन प्रोटोटाइप्स विकसित केले आहेत. त्यांचा फायदा सर्वांगीण आंतरसांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी होईल. हा ऑडी एजी आणि ऑडी एन्व्हायर्नमेंट फाऊंडेशन यांचा नुनामसोबतचा पहिला संयुक्त उद्यम प्रकल्प आहे.

सेकंड लाइफ बॅटरींवर चालणाऱ्या या ई-रिक्षा भारतात पायलट प्रकल्पाच्या स्वरूपात २०२३ च्या सुरूवातीच्या काळात येतील असे अपेक्षित आहे. ऑडी इ-ट्रॉनमध्ये आधी वापरण्यात आलेल्या बॅटरींद्वारे या ई-रिक्षांना ऊर्जा मिळाली आहे. “जुन्या बॅटरी अजूनही खूप शक्तिशाली आहेत,” असे मत नुनामचे सह-संस्थापक प्रदीप चॅटर्जी यांनी व्यक्त केले. “योग्य प्रकारे वापर केल्यास सेकंड लाइफ बॅटरींचा चांगला प्रभाव पडू शकतो. त्या आव्हानात्मक परिस्थितीत असलेल्या लोकांना उत्पन्न आणि आर्थिक स्वातंत्र्य एका शाश्वत पद्धतीने मिळवण्यासाठी मदत करू शकतात.”

या स्टार्टअपचे प्राथमिक ध्येय हे जुन्या बॅटरींचा वापर सेकंड लाइफ पॉवर स्टोअरेज यंत्रणा म्हणून करण्यासाठी पद्धतींचा विकास करण्याचे आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्य वाढवता येईल आणि स्त्रोतांचा अधिक कार्यक्षमतेने वापर करता येईल. “कार बॅटरींची रचना कारच्या आयुष्यभर टिकण्यासाठी केली गेली आहे. परंतु वाहनात त्यांचा सुरूवातीचा वापर झाल्यानंतरही त्यांच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे,” चॅटर्जी म्हणाले. “कमी रेंज आणि ऊर्जेच्या आवश्यकता तसेच एकूणच वजन कमी असलेल्या वाहनांसाठी त्या खूप चांगल्या ठरतील.

“आमच्या सेकंड लाइफ प्रोजेक्टमध्ये आम्ही इलेक्ट्रिक वाहनातील इलेक्ट्रिक कार्समधील बॅटरीजचा पुनर्वापर करतो. तुम्ही त्याला इलेक्ट्रिक मोबिलिटी लाइट असे म्हणू शकता. या प्रकारे आम्ही या मोठ्या वापराच्या परिस्थितीत या बॅटरी कशा प्रकारे ऊर्जा देऊ शकतात हे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत.”

A second life for electric car batteries: The German–Indian start-up Nunam is bringing three electric rickshaws to the roads of India. They are powered by used batteries taken from test vehicles in the Audi e-tron test fleet. The aim of the project is to explore how modules made with high-voltage batteries can be reused after their car life cycle and become a viable second-life use case.

नुनाम सातत्याने ई-रिक्षांची कामगिरी आणि रेंज यांच्यावर लक्ष ठेवते. हे सोशल उद्योजक उपलब्ध असलेली आणि त्यांनी गोळा केलेली सर्व ई-रिक्षा माहिती संभाव्य वापरकर्त्यांसाठी circularbattery.org या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करतात. खरेतर त्याची कॉपी बनवण्यास प्रोत्साहन दिले जाते.

“नुनामने सुरू केलेल्या उपक्रमांसारेख उपक्रम हे ई-कचऱ्याच्या नवीन वापराचे मार्ग शोधण्यासाठी आवश्यक आहेत. फक्त भारतातच नाही तर जगभरात. त्यामुळे नुनाम सेकंड लाइफ घटकांसोबत उत्पादने विकसित करण्यासाठी आपले ज्ञान इतरांना देते. त्यामुळे पर्यावरणीय- सामाजिक क्रांती पुढे नेता येईल,” असे ऑडीचे पर्यावरण फाऊंडेशन संस्थापर रूडीजेर रेकन्गेल यांनी सांगितले. ही संस्था नुनामला २०१९ पासून वित्तपुरवठा करत आहे.

याशिवाय बॅटरीचे पहिले आयुष्य ऑडी इ-ट्रॉनवर संपल्यावर आणि दुसरे आयुष्य ई-रिक्षावर वापरले गेल्यावर तिचे आयुष्य पूर्णपणे संपत नाही. तिसऱ्या टप्प्यात उर्वरित ऊर्जा असलेल्या बॅटरींचा वापर एलईडी लायटिंगसारख्या स्टेशनरी उपकरणांसाठी करता येईल. आम्हाला प्रत्येक बॅटरीचा रिसायकल करण्यापूर्वी शक्य तितका फायदा घ्यायचा आहे,” असे सह-संस्थापक प्रदीप चॅटर्जी म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments