Thursday, April 25, 2024
Homeकृषीसतत पाऊसामुळे हातरून मंडळ मधील तुरीचे पीक जळाले...शेतकऱ्यांनी तुर पिकावर फिरविला वखर...

सतत पाऊसामुळे हातरून मंडळ मधील तुरीचे पीक जळाले…शेतकऱ्यांनी तुर पिकावर फिरविला वखर…

Share

नया अंदुरा/कारंजा रम परिसरातील तुरीचे पीक जळाले अमोल साबळे नया अंदुरा – खारपानपट्ट्यातील परिसरातील दरवर्षी तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहे. यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात तुरीचा पेरा वाढला आहे परंतु नया अंदुरा, कारंजा रम, अंदुरा, हाता, शिंगोली, सोनाळा, लोणाग्रा, हातरूण, परिसरातील सतत पावसामुळे तुर पिकाला पावसाचे प्रमाण जास्त झाल्याने या परिसरातील तुरीचे पीक जळाले आहे.

शेतकरी विजय पाथर्डे यांच्या कारंजा रम शेतशिरातील ३ एकर तर अंदुरा शेतशिवारातील शेतकरी गोविंदा थोरात अंदुरा शेतशिवारातील गट ४६८ मधील तुर पीक जळाल्याने २ एकर पिकावर वखर फिरविल्याने शेतकरीवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे याबाबत शेतकरी चिंतेत सापडला आहे.गतवर्षी परिसरातील दुष्काळी परिस्थितीत पिकांच्या उत्पादनात प्रचंड कमी झाल्याने, शेतकरी संकटात सापडला होता.

यावर्षी सतत जोरदार पाऊस बरसत असल्याने, परिसरातील तूर पिके जळू लागली आहेत. त्यामुळे तुर उत्पादन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. तसेत व निंदन, डवरणी थांबली !पाऊस सतत हजेरी लावत असल्याने कपाशी, सोयाबीन मधे गवत प्रचंड वाढले आहे. निंदन, वखरणी, डवरणी इत्यादी कामे थांबली होती त्यामुळे पिकांमध्ये गवत वाढत असल्याने, पिके धोक्यात आली आहे


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: