Saturday, April 20, 2024
Homeराज्यदुर्गा माता मंदिर परिसरात हायमास्ट लाईट आणि आसन व्यवस्था लोकार्पण सोहळा संपन्न..!

दुर्गा माता मंदिर परिसरात हायमास्ट लाईट आणि आसन व्यवस्था लोकार्पण सोहळा संपन्न..!

Share

नरखेड – अतुल दंढारे

नरखेड पेठ विभागातील दुर्गा माता मंदिर परिसरात प्रकाशमय भक्तिमय वातावरणात हायमास्ट लाईट आणि आसन व्यवस्था लोकार्पण सोहळा सामाजिक कार्यकर्ते श्री साहेबरावजी वघाळे यांचे शुभ हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.

सॉफ्टवेअर अभियंता राजेश अशोकराव क्षिरसागर यांनी सामाजिक बांधिलकीतून मंदिर परिसर प्रकाशमय करण्याकरिता ४ हायमास्ट लाईट तसेच भाविकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था (२ बेंचेस) लावून दिले. मंदिर परिसर लखलखित प्रकाशमय झाल्याने नागरिक समाधान व आनंद व्यक्त करत आहे.

याप्रसंगी माजी उपाध्यक्ष श्री मनोजजी कोरडे, श्री श्यामरावजी बारई, माजी उपाध्यक्ष श्री अजयजी बालपांडे, श्री प्रशांतजी खुरसंगे, श्री धनराजजी खोडे, श्री. मोरेश्वरजी चरडे, श्री ओमप्रकाशजी चव्हाण, श्री भुपेश वैद्य, श्री शरदजी मदनकर, श्री वृषभ काळबांडे, श्री लीलाधरजी रेवतकर, श्री रमेशजी बालपांडे, श्री रामचंद्रजी बागडे, श्री सुनीलजी सोनटक्के, श्री सुरेंद्रजी बालपांडे, श्री भागवतजी रेवतकर, श्री हेमंत वघाळे, श्री सुनील कळंबे आदी उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: