राज्यात राजकीय भूकंप घडवून आणणारे एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार कारवाई केली आहे. त्यांची शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईनंतर लगेचच एकनाथ शिंदे यांनीही तिखट प्रतिक्रिया दिली असून उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही…
