दिगंबर उर्फ बालू मोहारे अध्यक्षपदी तर राजकुमार बंधाटे यांची उपाध्यक्षपदी निवड.
रामटेक वार्ताहर-
चिचाळा विविध कार्यकारी संस्थेची सार्वत्रिक निवडणूक मागील महिन्यात संपन्न झाली होती. या निवडणुकीत संस्थेचे कार्यकारी मंडळात एकूण 13 सदस्य निवडून आले होते. कार्यकारी मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडीसाठी रामटेक तालुका निबंधक कार्यालयात निवडणूक सभा दि.17 जून 2022 रोजी संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक रवींद्र वसू होते.
यावेळी दिगंबर उर्फ बालू मोहारे यांची अध्यक्षपदी तर राजकुमार बंधाटे यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. सभेला दिगंबर मोहारे,राजकुमार बंधाटे,रामेश्वर दमाहे,चंद्रसुभाष मोहारे,भीमराव ठकरेले,खुशाल पिसोडे,सुधाकर मदनकर,रेखाबाई गयगये यांचेसह सर्वच 13 सदस्य उपस्थित होते.महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. सुनील केदार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे रामटेक तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक संपन्न झाली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल अशी चर्चा होती मात्र प्रत्यक्षात ही निवडणूक अविरोध संपन्न झाली.