Homeराज्यश्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान च्या वतीने जिल्हाधिकारी चौधरी यांना निरोप तर नुतन...

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान च्या वतीने जिल्हाधिकारी चौधरी यांना निरोप तर नुतन जिल्हाधिकारी दयानिधी यांचे स्वागत…

सांगली प्रतिनिधी :– ज्योती मोरे.

सांगली जिल्हाचे माजी जिल्हाधिकारी डॉ.श्री. अभिजित चौधरी साहेब यांची छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली, त्यानिमित्त त्यांच्या निरोप समारंभास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

विशेषतः मध्ये सांगली जिल्ह्यात आलेल्या महापूरात त्यांनी केलेले काम व कोरोना काळात त्यांनी सांगली जिल्ह्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

या वेळी नूतन जिल्हाधिकारी डॉ. श्री.राजा दयानिधी यांचे सहर्ष स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सांगली जिल्ह्यामध्ये शेअर मार्केटींगच्या नावाखाली, थाटलेल्या बोगस कंपन्यांकडून होणार्या शेकडो कोटींची फसवणूक बाबत चर्चा केली.

यासंदर्भात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मार्फत मोठे आंदोलन उभे करीत आहोत. तरी या कंपन्यांकडून होणार्या फसवणूकी विरोधात ठोस पावले उचलून कडक कारवाई करण्यात यावी,अशी विनंती केली.

याबाबत, माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू असे आश्वासन नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments