Homeराज्यरामटेकचे बीडीओ गोडशेलवार, ग्राम विकास अधिकारी देशमुख व गाडघे यांना निरोप...

रामटेकचे बीडीओ गोडशेलवार, ग्राम विकास अधिकारी देशमुख व गाडघे यांना निरोप…

रामटेक – राजु कापसे

ग्राम पंचायत मनसर येथील सभागृहात शुक्रवार दिनांक १० जून २०२२ ला रामटेक पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मा संदीप गोडशेलवार तसेच मनसर ग्राम पंचायतचे ग्राम विकास अधिकारी श्री जीवनलाल देशमुख व कान्द्री खदान ग्राम पंचायतचे ग्राम विकास अधिकारी श्री नरेंद्र गाडघे यांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन निरोप देण्यात आला.

श्री संदीप गोडशेलवार यांची पंचायत समिती रामटेक वरून चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पंचायत समिती मध्ये बढती झालेली असून श्री जीवनलाल देशमुख नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत टाकळघाट तर नरेंद्र गाडघे यांची सावनेर पंचायत समिती अंतर्गत वाकोडी ग्राम पंचायत येथे ग्राम विकास अधिकारी म्हणून बदली झालेली आहे.

वरील तिन्ही अधिकारी यांनी खूप अल्पावधीमध्ये आपल्या कार्यशैलीमुळे अधिकारी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, लोकनेते, व नागरिक यांच्या मध्ये योग्य प्रकारे समन्वय साधून अनेक लोकोपयोगी व समाजोपयोगी विकासात्मक कामे करून आपल्या कर्तव्यदक्ष पद्धतीचा ठसा उमटवला.

सदर कार्यक्रमात निरोप समारंभ व सत्काराला उत्तर देतांना श्री गोडशेलवार,देशमुख व गाडघे यांच्यासह सभागृहात उपस्थित सर्व मंडळींच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. सदर निरोप समारंभ कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून सरपंच सौ योगेश्वरी हेमराज चोखांद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्री सतिश डोंगरे सह उपसरपंच चंद्रपाल नगरे,

ग्राम पंचायत सदस्य संगीता पंधराम, काजल कठोते, कांचन धनोरे,योगेश गोस्वामी, राजेंद्र रामटेके, नंदकिशोर चंदनखेडे,माजी ग्राम पंचायत सदस्य हेमराज चोखांंद्रे,दिनेश पंधराम, रोहित ताटी, नवनियुक्त ग्राम विकास अधिकारी श्री पवन उईके,ग्राम पंचायत कर्मचारी विलास मडावी, परशराम उपरे, वसंत कुवारे, आशिष जुनघरे इत्यादी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments