HomeFeaturedराज्यशिपुर येथे शेतात लावलेल्या गांजा प्रकरणी शेतकऱ्यांला चार दिवस पोलीस कोठडी, एक...

शिपुर येथे शेतात लावलेल्या गांजा प्रकरणी शेतकऱ्यांला चार दिवस पोलीस कोठडी, एक हजार किलो गांजा वर सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली होती कारवाई…

सांगली – ज्योती मोरे

मिरज तालुक्यातील शिपुर या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने उसाच्या शेतात लावलेल्या गांजाच्या झाडावर शुक्रवारी छापा टाकून मोठी कारवाई केली होती. यामध्ये जवळपास 486 गांजाची झाडे जप्त करण्यात आली.

एक कोटी पाच लाख ९२ हजार रुपयांची ही गांजाची झाडे जप्त करण्यात आली होती. जवळपास १०५९ किलो गांजा याठिकाणी जप्त करण्यात आला आहे.गुरुवारी सकाळी सहा वाजले पासून सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई सुरू केली होती याप्रकरणी संबंधित नंदकुमार बाबर या शेतकऱ्यांला अटक करण्यात आली होती.त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

शिपुर याठिकाणी नंदकुमार दिनकर बाबर यांच्या तीस गुंठे उसाच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला समजल्यानंतर राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक संध्यारानी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शुक्रवारी सकाळी 6 वाजता छापा टाकला. यावेळी उसाच्या शेतात मोठया प्रमाणावर गांजाची शेती केल्याचे आढळून आले.सदर पथकाने याठिकाणी 486 गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments