Homeराज्यविज कंत्राटी कामगारांच्या बदल्यांना अंतिम स्थगित-ऊर्जा राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे...

विज कंत्राटी कामगारांच्या बदल्यांना अंतिम स्थगित-ऊर्जा राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे…

कोल्हापूर – राजेद्र ढाले

(दि.९) रोजी ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने ऊर्जा राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णाजी देसाई व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा झाली विज कंत्राटी कामगारांच्या होणारे अन्याय व आर्थिक पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारावर स्थानिक अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशा सूचना दिल्या पैशाची मागणी करणे वेतनात कपात या समस्या सोडवण्यासाठी संघटना प्रतिनिधी,

प्रशासन यावर एकत्र बसून एक महिन्यात यावर उपाययोजना करावी कंत्राटदार विरहित सेवा घेण्याबाबत संघटनेच्या सल्ल्याने कंपनीचे पैसे वाचत आहे त्यातून कामगार जॉब सिक्युरिटी मिळेल व त्यांचे पगार डायरेक्ट कामगारांच्या बँक खात्यात जमा होईल माननीय खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या विशेष प्रयत्नातून,

ऊर्जा मंत्र्यांच्या सकारात्मक निर्णयामुळे कामगारांवर होणारा अन्याय त्वरित थांबल्या बद्दल संघटनेच्यावतीने मंत्री महोदय व सुप्रियाताई यांचे आभार मानले या मीटिंगसाठी प्रमुख उपस्थितांमध्ये ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णाजी देसाई महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष निलेश खरात उमेश आनेराव राहुल बोडके संतोष अंबाड राजू आव्हाड उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments