HomeFeaturedराज्यमाजी सैनिकांच्या विधवा पत्नींच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न, बौद्ध नवयुवक मंडळाचा आगळावेगळा उपक्रम...

माजी सैनिकांच्या विधवा पत्नींच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न, बौद्ध नवयुवक मंडळाचा आगळावेगळा उपक्रम…

संजय आठवले – आकोट

आकोट शहरातील खानापूर वेस येथील बौद्ध विहारासमोर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्य स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न झाला. हे ध्वजारोहण माजी सैनिकांच्या विधवा पत्नीच्या हस्ते करण्यात येऊन यानिमित्ताने त्या सैनिकांना ससन्मान आदरांजली वाहण्यात आली. हा उपक्रम येथील बौद्ध नवयुवक मंडळ तथा वंदना महिला संघाचे वतीने संपन्न झाला.

संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आकोट शहरातील खानापूर वेस येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या बौद्ध नवयुवक मंडळांने ध्वजारोहण समारंभाचे आयोजन केले. दरवर्षी या ध्वजारोहणासाठी कुण्या तरी प्रतिष्ठित मान्यवरांना पाचारण केले जाते. परंतु यावर्षी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

दिवंगत माजी सैनिकांनी केलेल्या देशसेवेच्या ऋणाची आठवण आणि त्यांच्या देशसेवेचा आदर करण्याकरिता ध्वजारोहणाचे निमित्ताने त्यांच्या अर्धांगिनींना सन्मानित करण्यात येत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष महेश तेलगोटे यांनी सांगितले. हे ध्वजारोहण श्रीमती लिलाबाई अभिमन्यू तेलगोटे यांचे हस्ते करण्यात आले. समारोहाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सरस्वतीबाई भाऊराव तेलगोटे ह्या तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती सखुबाई देविदास तेलगोटे आणि शशिकलाबाई पाखरे ह्या होत्या.

ध्वजारोहणानंतर बौद्ध नवयुवक मंडळाचे सदस्यांनी ७५ वृक्षरोपांचे रोपण केले.या संपूर्ण सोहळ्यासाठी बौद्ध नवयुवक मंडळाचे महेश तेलगोटे, हर्षल धांडे, देवा ओईंबे, आयुष तेलगोटे, नंदकिशोर खंडारे, संकेत तेलगोटे, रोहन दामोदर, अनिकेत पोहरकर, विशाल वानखडे, प्रशांत तेलगोटे, आनंद ओईंबे, रोशन गवई, सचिन तेलगोटे, विकी शामस्कार, गौरव तेलगोटे, शुभम घनबहादुर, रोशन जामनिक, नवनीत ओइंबे, अमर तेलगोटे, प्रमेय मोहोड, प्रणव आजणे, सुजन तेलगोटे, पप्पू तेलगोटे,संतोष तेलगोटे,

संदीप तेलगोटे, सदानंद तेलगोटे, रमेश तेलगोटे, प्रशांत तेलगोटे,शुभम तेलगोटे, राजकुमार तेलगोटे, दीपक आजणे ,दिनेश राक्षसकर,ऋत्विक इंगळे, सुनील घनबहादूर, प्रफुल्ल वानखडे, रमण तेलगोटे, विकी आठवले, रोहित तेलगोटे, सुरज पटेल, हर्ष आठवले, विनय आजणे, सुधीर पुंडकर, देवेश गवई, अजय खंडारे, भूषण पर्वतकर,

वैभव आठवले यांनी तर वंदना महिला संघाच्या सौ. मायाबाई तेलगोटे,सौ. शोभाबाई तेलगोटे,सौ. शिलाबाई धांडे, सौ. प्रतिभा आठवले, सौ. रुक्‍माबाई आठवले, सौ. अरुणाबाई धांडे यांनी अथक परिश्रम घेतले. दिवंगत माजी सैनिकांच्या विधवा पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण करविण्यात आल्याने बौद्ध नवयुवक मंडळाच्या सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments